Thursday, September 17, 2026
Navprabhatnews
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य
No Result
View All Result
Navprabhatnews
No Result
View All Result

चडचण — गोविंदपूर भीषण हत्याकांडमध्ये १२ जणांवर गुन्हा

संपादक-अमोगसिध्द मुंजे by संपादक-अमोगसिध्द मुंजे
May 30, 2026
in सोलापूर
0
चडचण — गोविंदपूर भीषण हत्याकांडमध्ये १२ जणांवर गुन्हा
0
SHARES
398
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

विशेष पथकाद्वारे आरोपींचा शोध सुरू  

विजयपूर –

भीमातीर परिसरात घडलेल्या भीषण सामूहिक हत्याकांडाप्रकरणी चडचण पोलीस ठाण्यात १२ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जमीनीच्या वादातून खून करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. चैतन्यकुमार दुंडप्पा निराळे यांच्या फिर्यादीवरून २९ मे रोजी हा गुन्हा दाखल करण्यात आला. गोविंदपूर येथील कल्लणगौड ईश्वरगौड पाटील यांच्यासह १२ जणांना आरोपी करण्यात आले आहे.
     घटनेनंतर उत्तर विभागाचे आयजीपी संदीप पाटील आणि जिल्हा पोलीस अधीक्षक लक्ष्मण निंबरगी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. आरोपींच्या अटकेसाठी विशेष पथक स्थापन करण्यात आले असून लवकरच त्यांना अटक करण्यात येईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

दुंडप्पा रेवणसिद्धप्पा निराळे (६५), शिवपुत्र रेवणसिद्ध निराळे (५८), राहुल निराळे (२५), समर्थ निराळे (२३) आणि शब्बीर अत्तार (४५) यांचा मृत्यू झाला. शनिवारी शवविच्छेदनानंतर चडचण येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
गोविंदपूर येथील  जमिनीच्या वादातून ही घटना घडल्याचे सांगण्यात येत  आहे. निवरगी गावातील तेली कुटुंबाची जमीन अनेक वर्षांपासून पडीक होती. सुमारे पाच ते सहा महिन्यांपूर्वी निराळे कुटुंबाने ती जमीन विकत घेतली होती. जमिनीवरील काटेरी झुडपे काढून साफसफाईचे काम सुरू असताना आरोपींनी विरोध केला. या संदर्भात तहसीलदार न्यायालयातही वाद सुरू होता आणि निकाल निराळे कुटुंबाच्या बाजूने लागला होता. त्यानंतरही आरोपींनी घटनास्थळी येऊन पीडितांच्या डोळ्यांत तिखट पावडर फेकली आणि धारदार शस्त्रांनी हल्ला करून त्यांची हत्या केल्याची चर्चा सुरू आहे.
तेली कुटुंबातील एका युवतीशी कल्लणगौड पाटील यांच्या मुलाने पळून जाऊन विवाह केला होता. त्यानंतर झालेल्या वैमनस्यातून त्याचा ट्रॅक्टरखाली चिरडून खून करण्यात आल्याचा  गुन्हा नोंद आहे. त्या प्रकरणानंतर संबंधित जमीन अनेक वर्षे पडीक राहिली होती. पुढे ती जमीन निराळे कुटुंबाने खरेदी केल्यानंतर पुन्हा वाद निर्माण झाला आणि त्याचे रूपांतर या भीषण हत्याकांडात झाल्याचे सांगितले जात आहे.

गोविंदपूर गावात शुक्रवारी दुपारी सुमारे २.३० ते ३ वाजण्याच्या दरम्यान शेतात काम सुरू असताना चाकू, कोयता आणि इतर धारदार शस्त्रांनी हल्ला करण्यात आला. या घटनेत एका कुटुंबातील पाच जणांसह एकूण सहा जणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर आणखी दोघेजण जखमी झाले आहेत. पोलीस अधीक्षक  यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथक स्थापन करण्यात आले आहे. आरोपींबाबत महत्त्वाची माहिती मिळाली असून त्यांना लवकरच अटक करण्यात येईल.
— संदीप पाटील, आयजीपी, उत्तर विभाग

*************
नवप्रभात न्युज पोर्टलला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा.
संपादक :- अमोगसिद्ध मुंजे
मो.नं. 9423535294

Previous Post

सामाजिक बांधिलकी जोपासत सुरेश हसापूरे यांचा वाढदिवस साजरा

Next Post

खो खो मध्ये धाराशिव तर कबड्डीमध्ये मुंबई उपनगर प्रथम क्रमांकाचे मानकरी

संपादक-अमोगसिध्द मुंजे

संपादक-अमोगसिध्द मुंजे

Next Post
खो खो मध्ये धाराशिव तर कबड्डीमध्ये मुंबई उपनगर प्रथम क्रमांकाचे मानकरी

खो खो मध्ये धाराशिव तर कबड्डीमध्ये मुंबई उपनगर प्रथम क्रमांकाचे मानकरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सेवा संकल्प अभियानाचे पहिले “मानकरी” ठरले शिक्षक

सेवा संकल्प अभियानाचे पहिले “मानकरी” ठरले शिक्षक

September 17, 2026
न्यायासाठी भटक्या समाजावर ऊन्हातच उपोषण करण्याची वेळ !

कंदलगावात मारहाण करून जबरी चोरी

September 17, 2026
दक्षिण पंचायतीपासून “सेवा संकल्प अभियान” सुरू

दक्षिण पंचायतीपासून “सेवा संकल्प अभियान” सुरू

September 17, 2026
“ट्रॉय”चे श्रीकांत भरले यांची तालुका अध्यक्षपदी निवड

“ट्रॉय”चे श्रीकांत भरले यांची तालुका अध्यक्षपदी निवड

September 17, 2026
“स्वच्छता ही सेवा” अभियान यशस्वीपणे राबवा. सीईओ कुशल जैन

“स्वच्छता ही सेवा” अभियान यशस्वीपणे राबवा. सीईओ कुशल जैन

September 16, 2026
माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांची उडाली तारांबळ

माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांची उडाली तारांबळ

September 16, 2026
तात्काळ “दक्षिण तालुका”  दुष्काळ जाहीर करा.

तात्काळ “दक्षिण तालुका” दुष्काळ जाहीर करा.

September 16, 2026
उद्घाटन कार्यक्रमात लोकप्रतिनिधींचा अपमान !

उद्घाटन कार्यक्रमात लोकप्रतिनिधींचा अपमान !

September 15, 2026

राजकारण

No Content Available
Load More

वेबसाईट दर्शक

136492

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य

© Website Design by Digital Buffalo - 9028927697