Sunday, September 13, 2026
Navprabhatnews
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य
No Result
View All Result
Navprabhatnews
No Result
View All Result

उमेदवारांची होणार ‘कटकट’ दूर

संपादक-अमोगसिध्द मुंजे by संपादक-अमोगसिध्द मुंजे
January 15, 2026
in सोलापूर
0
उमेदवारांची होणार ‘कटकट’ दूर

filter: 0; fileterIntensity: 0.0; filterMask: 0; captureOrientation: 0; brp_mask:0; brp_del_th:null; brp_del_sen:null; delta:null; module: photo;hw-remosaic: false;touch: (-1.0, -1.0);sceneMode: 8;cct_value: 0;AI_Scene: (-1, -1);aec_lux: 0.0;aec_lux_index: 0;albedo: ;confidence: ;motionLevel: -1;weatherinfo: null;temperature: 34;

0
SHARES
365
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

दुबार मतदारांकडून घेतले हमीपत्र
सोलापूर…
जिल्हा परिषद पंचायत व समिती निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करताना केवळ एका ‘सूचक’ आवश्यकता असणार आहे. त्यामुळे उमेदवारांची सूचक शोधण्याची कटकट कमी होणार आहे. शिवाय पक्ष व अपक्ष या दोघांसाठीही एकच सूचक निश्चित करण्यात आला आहे. यापूर्वी पक्षाच्या उमेदवाराला पाच सूचकांची आवश्यकता होती. मात्र त्या नियमात बदल करण्यात आला आहे. त्यामुळे सूचक शोधाशोध होणार नाही. दक्षिणमध्ये जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी १६ जानेवारीपासून ७ फेब्रुवारी पर्यंत आदर्श आचारसंहितेचे पालन करण्यात येणार आहे. त्यामुळे राजकीय पक्षांनी आचारसंहितेचे पालन करण्याचे आवाहन दक्षिणचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार किरण जमदाडे यांनी केले.
दक्षिण तालुक्यातील ६ जिल्हा परिषद गट व १२ पंचायत समिती गणासाठी ५ फेब्रुवारीला मतदान होणार असून दक्षिणमधील २४७ मतदान केंद्रांमधून २ लाख ६७ हजार २३७ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यामध्ये एक लाख १५ हजार २२८ पुरूष, एक लाख ८ हजार १२३ महिला तर १६ तृतीयपंथीय मतदारांचा समावेश आहे. यामध्ये ४ हजार ३७८ दुबार मतदार आहेत. त्यांच्याकडून एकाच ठिकाणी मतदान करण्याचे हमीपत्र घेण्यात आले असून प्रत्येक मतदान केंद्रावर हमीपत्र पोहोच करण्यात येणार आहे. दोन्ही ठिकाणची सही खात्री झाल्यानंतर मतदान करण्यास परवानगी देण्यात येणार आहे.
या निवडणुकीसाठी नामनिर्देशन पत्र भरण्याची प्रक्रिया १६ जानेवारी ते २१ जानेवारीपर्यंत असून २२ जानेवारी रोजी अर्जांची छाननी होणार आहे . २३ जानेवारी ते २७ जानेवारी दरम्यान अर्ज माघार घेण्याचा कालावधी आहे. मात्र यावेळी २५ जानेवारी रोजी रविवार आणि २६ जानेवारी प्रजासत्ताकदिन असल्यामुळे अर्ज माघारीची प्रक्रिया बंद राहणार आहे. त्यानंतर २७ जानेवारी रोजी उमेदवारांना चिन्ह वाटप करून अंतिम उमेदवारी निश्चित केली जाणार आहे . ५ फेब्रुवारी रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत मतदान होणार असून ७ फेब्रुवारी रोजी सकाळी दहा वाजल्यापासून मतमोजणीस सुरूवात होऊन निकाल जाहीर केला जाणार आहे.
निवडणूक प्रक्रिया पारदर्शक आणि शांततेत पार पाडण्यासाठी दोन हजारपेक्षा जास्त कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. त्यांना तीन टप्यात प्रशिक्षण देण्यात रेणार आहे. तसेच उमेदवारांना सर्व प्रकारचे परवाना देण्यासाठी एक खिडकी योजना सुरू करण्यात येणार आहे. यावेळी निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनानुसार आदर्श मतदान केंद्र निर्मितीसाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगण्यात आले. तसेच आचारसंहितेवर लक्ष ठेवण्यासाठी १८ स्थिर सर्वेक्षण पथक १८ ,फिरते सर्वेक्षण पथक १२ ,व्हिडिओ सर्वेक्षण पथक ०४ विशेष व्हिडिओ पथक ०२ असणार आहेत.
७ फेब्रुवारी रोजी ‘एस.आर.पी. कॅम्प’ (SRP Camp) येथे मतमोजणी प्रक्रीया पार पडणार आहे. निवडणूक निर्णय अधिकारी अंजली मरोड यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण यंत्रणा सज्ज झाली असून, मतदारांनी मोठ्या संख्येने मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

Previous Post

‘इथे’ झाला जिजाऊ व सावित्रीच्या लेकींचा ‘ सन्मान ‘

Next Post

पैलवानांना प्रोत्साहन देण्याचा उपक्रम

संपादक-अमोगसिध्द मुंजे

संपादक-अमोगसिध्द मुंजे

Next Post
पैलवानांना प्रोत्साहन देण्याचा उपक्रम

पैलवानांना प्रोत्साहन देण्याचा उपक्रम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मंद्रूपमध्ये हतबल शेतकऱ्याने तीन एकर मुग व कोथिंबीरवर फिरवला रोटर,

मंद्रूपमध्ये हतबल शेतकऱ्याने तीन एकर मुग व कोथिंबीरवर फिरवला रोटर,

September 13, 2026
सकळेश्वर देवाची यात्रा उत्साहात

सकळेश्वर देवाची यात्रा उत्साहात

September 13, 2026
सिद्धारूढ स्वामींचे विचार आचरणात आणणे हीच खरी सेवा: नरेंद्र काळे

सिद्धारूढ स्वामींचे विचार आचरणात आणणे हीच खरी सेवा: नरेंद्र काळे

September 13, 2026
२४ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पत्रकारांच्या घरांचे स्वप्न साकारले

२४ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पत्रकारांच्या घरांचे स्वप्न साकारले

September 12, 2026
गांधी जयंतीदिनी आत्मदहन करणार..  महांतेश्वर कट्टीमनी

गांधी जयंतीदिनी आत्मदहन करणार.. महांतेश्वर कट्टीमनी

September 10, 2026
नियम बाजूला ठेवून “दुष्काळ” जाहीर करा..

नागरिकांनी ‘सामोपचारा’ने वाद मिटवावे.. जिल्हा व सत्र न्यायाधीश मनोज शर्मा यांचे आवाहन

September 9, 2026
“लिंगायत दफनभूमी”साठी वन खात्याची जागा देणार.. वनमंत्री नाईक

“लिंगायत दफनभूमी”साठी वन खात्याची जागा देणार.. वनमंत्री नाईक

September 9, 2026
नियम बाजूला ठेवून “दुष्काळ” जाहीर करा..

अधिकार्‍यांचा गाव पातळीवर ” रात्रीचा मुक्काम”

September 9, 2026

राजकारण

No Content Available
Load More

वेबसाईट दर्शक

133831

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य

© Website Design by Digital Buffalo - 9028927697