Monday, September 14, 2026
Navprabhatnews
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य
No Result
View All Result
Navprabhatnews
No Result
View All Result

दक्षिणमध्ये ‘किस मे कितना है दम’

राजकीय प्रतीस्पर्धी आमनेसामने

संपादक-अमोगसिध्द मुंजे by संपादक-अमोगसिध्द मुंजे
January 28, 2026
in सोलापूर
0
हत्तूरच्या विकासासाठी “डिपीडीसी” निधी भरभरून दिला
0
SHARES
70
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

दक्षिणमध्ये राजकीय वातावणर तापले

दक्षिण सोलापूर….
मंगळवारी अर्ज माघार घेण्याच्या शेवटच्या दिवशी ११४ उमेदवारांनी अर्ज माघार घेतल्याने व १८ जागांसाठी ८० उमेदवार रींगणात असल्याने दक्षिणमधील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकीचा अंतिम चित्र स्पष्ट झाली आहे. त्यामुळे एकमेकांचे राजकीय स्पर्धक व विरोधक आमनेसामने आले असून ‘किस मे कितना है दम’ म्हणत निवडणूकीच्या मैदानात उतरले आहेत. यामुळे ‘अस्तित्व’ आणि ‘प्रतिष्ठा’ सिध्द होणार असून कोण ‘बाजीगर’ ठरणार ? हे ७ फेब्रुवारीला सिध्द होणार आहे.
दक्षिणमध्ये अक्कलकोट विधानसभा मतदारसंघात तीन जिल्हा परिषद गट व पाच पंचायत समिती गण तर सोलापूर दक्षिण मतदारसंघात तीन जिल्हा परिषद गट व सात पंचायत समिती गणामध्ये विभागणी झाली आहे. यामध्ये दक्षिणमध्ये ‘बापू’ तर अक्कलकोटमध्ये ‘दादां’नी कार्यकर्त्यांना ‘आपल्या’ संधी दिली आहे. त्यामुळे त्यांचीही प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
सर्वाधिक लक्ष वेधलेल्या हत्तूर गटातून भाजपाच्या उज्वला हविनाळे व शिवसेनेच्या लक्ष्मीताई पाटील यांच्यातील लढत रंगतदार होणार आहे. गत निवडणूकीत भाजपाचे डाॅ. चनगोंडा हविनाळे व शिवसेनेचे अमर पाटील यांच्यातील लढतीत अमर पाटील यांनी बाजी मारली होती. नऊ वर्षानंतर पुन्हा हविनाळे व पाटील परीवार आमनेसामने आली आहेत. त्यामुळे ही निवडणूक डाॅ. हविनाळे यांच्यासाठी प्रतिष्ठेची तर पाटील यांच्यासाठी अस्तित्वाची ठरणार आहे.
भंडारकवठे जिल्हा परिषद गट अनूसूचित जमाती प्रवर्गासाठी राखीव असल्याने याठिकाणी जात प्रमाणपत्र वैद्यतेमुळे उमेदवारांची संख्या कमी आहे. मात्र या गटात निवृत्त उपअभियंता महेंद्र उंबरजे यांच्या पत्नी सविता उंबरजे व निवृत्त शिक्षक अमोगसिध्द कमळे यांची कन्या रूपादेवी कमळे यांच्यामध्ये सामना होत आहे. शिवाय शिवसेनेच्या जयश्री संगोळगी व राष्र्टवादीच्या कांचन खडाखडे यांचा कोणाला फटका बसणार? हे निकालानंतर स्पष्ट होणार आहे.
मंद्रूप जिल्हा परिषद गटातून सर्वसाधारण महिला प्रवर्गातून भाजपाच्या सोनाली कडते , राष्र्टवादीच्या प्रिती कोरे, काॅंग्रेसच्या सनाकौसर शेख व प्रियांका बरूरे यांच्यामध्ये लढत होत आहे. याठिकाणी माजी सभापती सोनाली कडते व माजी जिल्हा परिषद सदस्या विद्युलता कोरे यांच्या कन्या प्रिती कोरे यांच्यातील लढतीकडे सर्वांचे लक्ष लागली आहे. तसेच काॅंग्रेसचे सचिव महमद शेख यांनीही कंबर कसली असूस पत्नी सनाकौसर यांना निवडून आणण्यासाठी जोरदार प्रचार सुरू केला आहे. त्यामुळे त्यांचा फटका कोणाला बसणार ? हे निकालानंतर दिसणार आहे.
दक्षिणमध्ये जिल्हा परिषद व पंचायत समिती उमेदवारी देताना आमदार सुभाष देशमुख व माजी आमदार दिलीप माने यांच्यामधील गटबाजी उफाळुन आली होती. यामध्ये आमदार देशमुख गटाने बाजी मारली असून त्यांच्या कार्यकर्त्यांकडून जोरदार प्रचार सुरू आहे. मात्र माजी आमदार दिलीप माने गटाचे कार्यकर्ते प्रचारात अद्याप सक्रीय नसल्याने निकालाविषयी उत्सुकता लागली आहे.

Previous Post

राष्र्टभक्तीसाठी पाच हजार विद्यार्थांचे शिस्तबध्द कवायत

Next Post

अन्  भाजपाच्या उमेदवारांनी घेतला हा निर्णय

संपादक-अमोगसिध्द मुंजे

संपादक-अमोगसिध्द मुंजे

Next Post
अन्  भाजपाच्या उमेदवारांनी घेतला हा निर्णय

अन्  भाजपाच्या उमेदवारांनी घेतला हा निर्णय

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मंद्रूपमध्ये हतबल शेतकऱ्याने तीन एकर मुग व कोथिंबीरवर फिरवला रोटर,

मंद्रूपमध्ये हतबल शेतकऱ्याने तीन एकर मुग व कोथिंबीरवर फिरवला रोटर,

September 13, 2026
सकळेश्वर देवाची यात्रा उत्साहात

सकळेश्वर देवाची यात्रा उत्साहात

September 13, 2026
सिद्धारूढ स्वामींचे विचार आचरणात आणणे हीच खरी सेवा: नरेंद्र काळे

सिद्धारूढ स्वामींचे विचार आचरणात आणणे हीच खरी सेवा: नरेंद्र काळे

September 13, 2026
२४ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पत्रकारांच्या घरांचे स्वप्न साकारले

२४ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पत्रकारांच्या घरांचे स्वप्न साकारले

September 12, 2026
गांधी जयंतीदिनी आत्मदहन करणार..  महांतेश्वर कट्टीमनी

गांधी जयंतीदिनी आत्मदहन करणार.. महांतेश्वर कट्टीमनी

September 10, 2026
नियम बाजूला ठेवून “दुष्काळ” जाहीर करा..

नागरिकांनी ‘सामोपचारा’ने वाद मिटवावे.. जिल्हा व सत्र न्यायाधीश मनोज शर्मा यांचे आवाहन

September 9, 2026
“लिंगायत दफनभूमी”साठी वन खात्याची जागा देणार.. वनमंत्री नाईक

“लिंगायत दफनभूमी”साठी वन खात्याची जागा देणार.. वनमंत्री नाईक

September 9, 2026
नियम बाजूला ठेवून “दुष्काळ” जाहीर करा..

अधिकार्‍यांचा गाव पातळीवर ” रात्रीचा मुक्काम”

September 9, 2026

राजकारण

No Content Available
Load More

वेबसाईट दर्शक

133921

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य

© Website Design by Digital Buffalo - 9028927697