Monday, September 14, 2026
Navprabhatnews
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य
No Result
View All Result
Navprabhatnews
No Result
View All Result

अन्  भाजपाच्या उमेदवारांनी घेतला हा निर्णय

संपादक-अमोगसिध्द मुंजे by संपादक-अमोगसिध्द मुंजे
January 28, 2026
in सोलापूर
0
अन्  भाजपाच्या उमेदवारांनी घेतला हा निर्णय
0
SHARES
1.1k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 भाजपचे उमेदवार मळसिध्द मुगळे यांच्याकडून अजित पवार यांना अनोखी श्रद्धांजली

निवडणूक होईपर्यंत प्रचार शुभारंभ न करण्याचा निर्धार

मंद्रूप..

मंद्रूप पंचायत समिती गणात भाजप उमेदवार मळसिध्द मुगळे व राष्र्टवादीचे अप्पाराव कोरे यांच्यामध्ये ‘काटे कि टक्कर’ लढत होत आहे. त्यामुळे मुगळे भाजपाकडून शुभारंभ करून प्रचारास सुरूवात करणार होते. बुधवारी २८ जानेवारी रोजी सकाळी दहा वाजता मंद्रूप येथील मळसिध्द मंदिरात मंद्रूप पंचायत समिती गणाचे उमेदवार मळसिध्द मुगळे हे सहकाऱ्यांसमवेत नारळ वाढवून प्रचाराचा शुभारंभ करणार होते . त्यासाठी हलगीचा कडकडाट अन् कार्यकर्त्यांकडून जयघोषही सुरू होता. नऊ वाजल्यापासून वातावरणनिर्मिती आणि कार्यकर्त्यांची जमवाजमव सुरू होती. साडेनऊ वाजता पदयात्रा काढून दहा वाजता मंदिरात पोहोचले. यावेळी मंदिरात प्रवेश करून प्रचार शुभारंभ नारळ फोडताच मुगळे यांना राज्याचे उपमुख्यमंत्री व राष्र्टवादीचे अध्यक्ष अजित दादा पवार यांचा विमान दुर्घटनात निधन झाल्याची माहिती मिळाली. त्यामुळे मुगळे यांनी क्षणाचाही विचार न करता राजकीय मतभेद बाजूला ठेऊन प्रचार शुभारंभ रद्द केला.  मळसिद्ध मंदिरातच कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत अजित दादा पवार यांना श्रद्धांजली वाहिली.

  यावेळी उमेदवार मुगळे यांनी अजितदादा पवार हे स्पष्टवक्ते , कार्यकर्त्यांची कदर असणारा तसेच वेळेला महत्त्व देणारा नेतृत्व होते. ते कोणत्याही पक्षात असले तरी त्यांच्याविषयी आधारच आहे . त्यांच्या नेतृत्वाखाली राज्याचा मोठ्या प्रमाणात विकास झाला आहे . ते राज्याचे प्रभावशील व विकास प्रिय नेतृत्व होते . त्यामुळे निवडणूकीतील प्रचारापेक्षाही राज्याची झालेली हानी महत्त्वाची आहे. स्थानिक राजकारणात राष्र्टवादी विरोधी पक्ष असला तरी राज्यात महायुती सरकार आहे. शिवाय अजितदादा पवार हे आदर्श नेतृत्व होते. म्हणून

निवडणुका होईपर्यंत प्रचार शुभारंभ न करता घरोघरी जाऊन मतदारांना मतदान करण्याविषयी साद घालणार असल्याचे मुगळे यांनी सांगितले.

Previous Post

दक्षिणमध्ये ‘किस मे कितना है दम’

Next Post

प्रचारसभेचे रूपांतर झाले शोकसभेत

संपादक-अमोगसिध्द मुंजे

संपादक-अमोगसिध्द मुंजे

Next Post
प्रचारसभेचे रूपांतर झाले शोकसभेत

प्रचारसभेचे रूपांतर झाले शोकसभेत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मंद्रूपमध्ये हतबल शेतकऱ्याने तीन एकर मुग व कोथिंबीरवर फिरवला रोटर,

मंद्रूपमध्ये हतबल शेतकऱ्याने तीन एकर मुग व कोथिंबीरवर फिरवला रोटर,

September 13, 2026
सकळेश्वर देवाची यात्रा उत्साहात

सकळेश्वर देवाची यात्रा उत्साहात

September 13, 2026
सिद्धारूढ स्वामींचे विचार आचरणात आणणे हीच खरी सेवा: नरेंद्र काळे

सिद्धारूढ स्वामींचे विचार आचरणात आणणे हीच खरी सेवा: नरेंद्र काळे

September 13, 2026
२४ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पत्रकारांच्या घरांचे स्वप्न साकारले

२४ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पत्रकारांच्या घरांचे स्वप्न साकारले

September 12, 2026
गांधी जयंतीदिनी आत्मदहन करणार..  महांतेश्वर कट्टीमनी

गांधी जयंतीदिनी आत्मदहन करणार.. महांतेश्वर कट्टीमनी

September 10, 2026
नियम बाजूला ठेवून “दुष्काळ” जाहीर करा..

नागरिकांनी ‘सामोपचारा’ने वाद मिटवावे.. जिल्हा व सत्र न्यायाधीश मनोज शर्मा यांचे आवाहन

September 9, 2026
“लिंगायत दफनभूमी”साठी वन खात्याची जागा देणार.. वनमंत्री नाईक

“लिंगायत दफनभूमी”साठी वन खात्याची जागा देणार.. वनमंत्री नाईक

September 9, 2026
नियम बाजूला ठेवून “दुष्काळ” जाहीर करा..

अधिकार्‍यांचा गाव पातळीवर ” रात्रीचा मुक्काम”

September 9, 2026

राजकारण

No Content Available
Load More

वेबसाईट दर्शक

133921

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य

© Website Design by Digital Buffalo - 9028927697