Saturday, June 27, 2026
Navprabhatnews
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य
No Result
View All Result
Navprabhatnews
No Result
View All Result

प्रचारसभेचे रूपांतर झाले शोकसभेत

हत्तूर येथे आमदार सुभाष देशमुख यांच्याकडून अजितदादांना श्रध्दांजली

संपादक-अमोगसिध्द मुंजे by संपादक-अमोगसिध्द मुंजे
January 28, 2026
in सोलापूर
0
प्रचारसभेचे रूपांतर झाले शोकसभेत
0
SHARES
547
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

हत्तूर येथील  प्रचार शुभारंभ करण्यात आला रद्द
हत्तूर..
दक्षिण सोलापूर पंचायत समितीवर कमळ फुलविण्यासाठी व जिल्हा परिषद भाजपाच्या ताब्यात घेण्यासाठी दक्षिण सोलापूरचे आमदार सुभाष देशमुख राजकीय व्यूहरचना आखत आहेत. त्यामुळे मंगळवारी २७ जानेवारीला उमेदवारी अर्ज माघार घेतल्यानंतर बुधवार २८ जानेवारीपासून प्रचारास सुरूवात होणार असल्याने हत्तूर येथे सकाळी १० वाजता भाजपाच्या उमेदवारांचा प्रचार शुभारंभ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी वेळेला महत्व देणारे आमदार सुभाष देशमुख हे सकाळी दहा वाजता हत्तूर येथील सोमेश्वर व बनसिध्देश्वर मंदिरात पोहोचले. नारळ वाढवून प्रचार शुभारंभ होणार होता. त्यासाठी हत्तूर जिल्हा परिषद गटासह दक्षिणमधील भाजपा कार्यकर्ते व पदाधिकारीही मोठ्या संख्येने उपस्थित होते. मात्र सकाळी नऊ वाजण्याच्या दरम्यान बारामती येथे विमान दुर्घटनेत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे दुर्दैवी निधन झाल्याची बातमी कळाली. यावेळी आमदार देशमुख यांनी प्रचार शुभारंभ करण्याऐवजी शोकसभा घेऊन अजितदादांना श्रध्दांजली वाहीली. यावेळी आमदार देशमुख ,जिल्हा परिषदेच्या उमेदवार डाॅ. उज्वला हविनाळे, पंचायत समिती उमेदवार पंचप्पा धनशेटी व संदिप टेळे , हणमंत कुलकर्णी, डाॅ. चनगोंडा हविनाळे, संगप्पा केरके, यतीन शहा, प्रशांत कडते, महेंद्र उंबरजे, डाॅ. अनिल हविनाळे, नितीन रणखांबे, विक्रांत हविनाळे यांच्यासह भाजपा पदाधिकारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.यावेळी आमदार देशमुख यांनी प्रचार शुभारंभाला फाटा देऊन राष्र्टवादीचे अध्यक्ष उपमुख्यमंत्री व विधानसभेतील सहकारी अजितदादा पवार यांच्या दुर्दैवी निधनाबद्दल शोक व्यक्त केला . यावेळी उपस्थितांनी अजितदादा यांना श्रध्दांजली वाहीली.

Previous Post

अन्  भाजपाच्या उमेदवारांनी घेतला हा निर्णय

Next Post

ताई, तुमचा विजय निश्चित

संपादक-अमोगसिध्द मुंजे

संपादक-अमोगसिध्द मुंजे

Next Post
ताई, तुमचा विजय निश्चित

ताई, तुमचा विजय निश्चित

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पुणे विभागातील २२ शेतकऱ्यांना विविध कृषी पुरस्कार जाहीर

पुणे विभागातील २२ शेतकऱ्यांना विविध कृषी पुरस्कार जाहीर

June 27, 2026
औराद मंडल अधिकार्‍यांची कारवाई “संशयास्पद

औराद मंडल अधिकार्‍यांची कारवाई “संशयास्पद

June 26, 2026
गतिमान आणि पारदर्शकतेसाठी मंत्रालयीन उपविभागांचे स्वतंत्र कारभार

राज्यातील 56 लाख शेतकऱ्यांना 36 हजार पाचशे कोटी रुपये वितरित होणार

June 26, 2026
विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना बळ देण्यासाठी सदैव तत्पर.. महादेव कोगनूरे यांची ग्वाही

विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना बळ देण्यासाठी सदैव तत्पर.. महादेव कोगनूरे यांची ग्वाही

June 26, 2026
निंबर्गीच्या शिरपेचात मानाचा तुरा, गंगाधर बिराजदार यांना वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार

निंबर्गीच्या शिरपेचात मानाचा तुरा, गंगाधर बिराजदार यांना वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार

June 26, 2026
स्थानिक गुन्हे शाखेकडून एसी चोरी करणारी टोळी गजाआड

स्थानिक गुन्हे शाखेकडून एसी चोरी करणारी टोळी गजाआड

June 25, 2026
आषाढी यात्रेतील भाविकांच्या सुविधांसाठी झेडपीच्या  सर्वसाधारण सभेत सर्व कामांना मंजुरी

आषाढी यात्रेतील भाविकांच्या सुविधांसाठी झेडपीच्या सर्वसाधारण सभेत सर्व कामांना मंजुरी

June 25, 2026
खासदार संजय दिना पाटील यांच्या विरोधात पत्रकारांचे निदर्शन

खासदार संजय दिना पाटील यांच्या विरोधात पत्रकारांचे निदर्शन

June 25, 2026

राजकारण

No Content Available
Load More

वेबसाईट दर्शक