श्री महात्मा बसवेश्वर प्रतिष्ठानकडून कर्तृत्ववान महिलांचा ‘नारीशक्ती’ पुरस्काराने गौरव
सोलापूर… जगद् ज्योती महात्मा बसवेश्वर जयंतीचे औचित्य साधून ‘श्री महात्मा बसवेश्वर प्रतिष्ठान’ जुळे सोलापूर यांच्या वतीने समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांना ‘नारीशक्ती’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.या सोहळ्यात सरोजिनी टिपे, मीनल दास, डॉ. वैशाली मैदर्गी, शिक्षिका रूपाली येळमेली, माजी सभापती विद्या शिंदे, प्रांजली मोहेकर, कल्पना भोसले, आरती कुशेकर आणि अरुंधती हराळकर या महिलांना त्यांच्या कार्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते ‘नारीशक्ती पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.
कार्यक्रमाला प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्रीशैल हत्तुरे, उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर आणि मंजुषा दोडकर यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना मान्यवरांनी महात्मा बसवेश्वरांच्या विचारांची सुसंगतता सांगत, महिलांच्या कार्याचे कौतुक केले.
याप्रसंगी संभाजी ब्रिगेडचे श्याम कदम, सुरेखा पडसलगी, एड. केदार पाटील, जगदेव सुरवसे, चंद्रकांत कुलकर्णी, संभाजी भोसले, उत्सव अध्यक्ष महेश इचगे, उपाध्यक्ष राहुल उपासे, सचिव शिवराय आलूरे, कोषाध्यक्ष लिंगराज ख्याड, कार्याध्यक्ष सिद्धाराम येणेगुरे, परमेश्वर माळगे, सचिन कोटाणे.अजिंक्य उपीन यांच्यासह प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा कार्यक्रम जुळे सोलापूर परिसरात उत्साहात पार पडला.
_________________________________
*🛑नवप्रभात न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा*
*संपादक :- अमोगसिद्ध मुंजे*
*9423535294*









