Tuesday, June 9, 2026
Navprabhatnews
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य
No Result
View All Result
Navprabhatnews
No Result
View All Result

‘ पेन्शन आमच्या हक्काची’ म्हणत शासकीय कर्मचारी संपावर

संपादक-अमोगसिध्द मुंजे by संपादक-अमोगसिध्द मुंजे
April 21, 2026
in सोलापूर
0
‘ पेन्शन आमच्या हक्काची’ म्हणत शासकीय कर्मचारी संपावर
0
SHARES
51
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

‘जुनी पेन्शन योजने’साठी सरकारी कर्मचारी बेमुदत संपावर!

सोलापूर:
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी मंगळवारी सकाळी जुन्या सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राज्य सरकारी कर्मचारी संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले. शासनाने दीर्घकाळ प्रलंबित प्रश्नांवर तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. या आंदोलनात कर्मचारी, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच विविध विभागांतील अधिकारी-कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
सरकारने संवेदनशीलता दाखवून निवृत्ती वेतन योजना तातडीने लागू करणे, रिक्त पदभरती प्रक्रिया सुरू करणे, कंत्राटी कर्मचाऱ्यांना नियमित सेवेत सामावून घेणे, अनुकंपा  तत्त्वावरील नियुक्त्या देणे, तसेच कर्मचाऱ्यांचे इतर सेवाविषयक प्रश्न सोडविणे या कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अन्यथा आगामी काळात आंदोलन तीव्र करण्यात येईल, असा इशारा कर्मचारी संघटनांकडून देण्यात आला. यावेळी राजीव साळुंखे, अमृत कोकाटे, शंतनु गायकवाड, अशोक इंदापुरे, आदींसह विविध कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी सदस्य आणि सरकारी निमसरकारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आंदोलनास उपस्थित होते.
माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळात सुधारीत राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना” जाहिर करुन शासनाने महाराष्ट्र राज्यातील कर्मचारी-शिक्षकांना दिलासा दिला. परंतू सदर योजना कार्यान्वित होण्यासाठी आवश्यक असणा-या अटी, नियम व कार्यपध्दती संदर्भातील अधिसूचना किंवा परिपत्रक अद्याप पारित केलेले नाही. त्यामुळे सदरची योजना १ मार्च २०२४ पासून लागू झाली असल्यामुळे दि.०१ मार्च २०२४ पासून आजपर्यंतच्या कालावधीत सेवानिवृत्त झालेल्या कर्मचा-यांचे “पेन्शन” संदर्भातील भवितव्य अद्याप टांगणीवर लागलेले आहे. संबंधितांना तात्पुरते निवृत्ती वेतन देखील प्राप्त झालेली नसल्याचे कर्मचार्‍यांकडून सांगण्यात आले.
__________________________________
*🛑नवप्रभात न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा*
*संपादक :- अमोगसिद्ध मुंजे*
*9423535294*

Previous Post

जुळे सोलापूरात महात्मा बसवेश्वर जयंतीनिमित्त ‘कर्तृत्ववान महिलां’चा सन्मान

Next Post

आषाढी वारी हायटेक होणार .. सिईओ जैन

संपादक-अमोगसिध्द मुंजे

संपादक-अमोगसिध्द मुंजे

Next Post
आषाढी वारी हायटेक होणार .. सिईओ जैन

आषाढी वारी हायटेक होणार .. सिईओ जैन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

साक्षी भैरामडगी वळसंगच्या एक दिवसाच्या सरपंच

साक्षी भैरामडगी वळसंगच्या एक दिवसाच्या सरपंच

June 6, 2026
शिवरायांनी अठरापगड जातींच्या लोकांना एकत्र करून स्वराज्य उभारले- पालकमंत्री

शिवरायांनी अठरापगड जातींच्या लोकांना एकत्र करून स्वराज्य उभारले- पालकमंत्री

June 6, 2026
मंद्रूपच्या तहसीलदारांवर “वाॅच”

औराद महसूल मंडळात अवैध मुरूम उपशाचा धुमाकूळ

June 5, 2026
हयात प्रमाणपत्रासाठी लाभार्थ्यांचे हेलपाटे कमी होणार !

हयात प्रमाणपत्रासाठी लाभार्थ्यांचे हेलपाटे कमी होणार !

June 5, 2026
वारी काळात अधिकारी व कर्मचारी यांना रजा नाही , मोबाईल बंद ठेवल्यास कारवाई – विभागीय आयुक्त शितल तेली – उगले

वारी काळात अधिकारी व कर्मचारी यांना रजा नाही , मोबाईल बंद ठेवल्यास कारवाई – विभागीय आयुक्त शितल तेली – उगले

June 5, 2026
‘गोकुळ’च्या थकीत बिलासाठी शेतकर्‍यांचे अर्धनग्न आंदोलन

‘गोकुळ’च्या थकीत बिलासाठी शेतकर्‍यांचे अर्धनग्न आंदोलन

June 4, 2026
28 हजार 298 परीक्षार्थी देणार टीईटी परीक्षा

28 हजार 298 परीक्षार्थी देणार टीईटी परीक्षा

June 4, 2026
“सावकारां”च्या वाढदिवसाला रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

“सावकारां”च्या वाढदिवसाला रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

June 4, 2026

राजकारण

No Content Available
Load More

वेबसाईट दर्शक