Monday, June 8, 2026
Navprabhatnews
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य
No Result
View All Result
Navprabhatnews
No Result
View All Result

आषाढी वारी हायटेक होणार .. सिईओ जैन

संपादक-अमोगसिध्द मुंजे by संपादक-अमोगसिध्द मुंजे
April 22, 2026
in सोलापूर
0
आषाढी वारी हायटेक होणार .. सिईओ जैन
0
SHARES
36
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सिइओंकडून पालखी मार्गाची पाहणी

पंढरपूर..

पालखी मार्गावर वारकरी यांना सुविधा देण्यासाठी संवाद यंत्रणा अती जलद राहिल याची दक्षता घेणेत येत आहे. मुख्यमंत्री वारकरी निवारा कक्षात गतवर्षी चांगल्या सुविधा दिल्यामुळे वारकरी यांचे होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेऊन काळजी घेणेत येत आहे. माहिती तंत्रज्ञानाचा उपयोग वारकरी यांचे साठी करणेत येणार आहे. वारकरी यांचे सेवेसाठी जिल्हा परिषदेचे कर्मचारी यांचे बरोबरच राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक यांची देखील मदत घेणेत येणार आहे. यात्रेपूर्वी यंत्रणेत पडणारा ताण कमी करणेसाठी आता पासून नियोजन व त्यांची प्रभावी अंमलबजावणी करणेसाठी नियोजन करणेत येत आहे.

आषाढी यात्रेत पालखी मार्गावरील वारकर्‍यांना सुविधा देण्यासाठी दक्ष रहा. आषाढी यात्रेची तयारी आता पासून सुरू करा. अशा सुचना सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी आज दिल्या.
सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस व पंढरपूर तालुक्यातील संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज पालखी मार्गावरील धर्मपुरी, खुडूस , कारूंडे, सदाशिवनगर, पुरंदावडे, वेळापूर वाखरी, भंडीशेगाव तर संत तुकाराम महाराज पालखी मार्गावरील पिराची कुरोली, महाळुंग, बोरगाव, अकलूज, माळीनगर या पालखी मार्गाची व पालखी तळाची पाहणी सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी केली. या दौर्‍यात अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिणकर, उप मुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील, पंढरपूरचे गटविकास अधिकारी अमोल जाधव , माळशिरस पंचायत समिती गटविकास अधिकारी रघुनाथ पांढरे, जिल्हा कक्षातील वैभव आहाळे, उप अभियंता बांधकाम, उप अभियंता पाणी पुरवठा, विस्तार अधिकारी, सरपंच , पंचायत अधिकारी उपस्थित होते.
वाखरी पालखी तळापासून धर्मपुरी पर्यंत वारकरी यांना देणेत येणारे सुविधांचाही माहिती जाणून घेतली. त्यानंतर संत तुकाराम पालखी मार्गावरील पालखी तळाची पाहणी केली. एका दिवसात दोन पालखी मार्गावरील मुक्कामी व विश्रांतीची ठिकाणावरील पिण्याच्या पाण्याच्या सुविधा, मुख्यमंत्री वारकरी निवारा कक्ष,रस्ते, शौचालय व स्नानगृह सुविधासाठी ची जागा, पालखी तळाची स्वच्छता, पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत याची माहिती घेऊन त्या संबंधित अधिकारी व कर्मचारी यांना आतापासून सुविधांची तयारी करण्याच्या सुचना सिईओ जैन यांनी दिल्या.

__________________________________
*🛑नवप्रभात न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा*
*संपादक :- अमोगसिद्ध मुंजे*
*9423535294*

 

Previous Post

‘ पेन्शन आमच्या हक्काची’ म्हणत शासकीय कर्मचारी संपावर

Next Post

पशूसंवर्धन विभागाला येणार ‘ अच्छे दिन ‘ … सभापती रामप्पा चिवडशेट्टी यांची माहीती

संपादक-अमोगसिध्द मुंजे

संपादक-अमोगसिध्द मुंजे

Next Post
पशूसंवर्धन विभागाला येणार ‘ अच्छे दिन ‘ … सभापती रामप्पा चिवडशेट्टी यांची माहीती

पशूसंवर्धन विभागाला येणार ' अच्छे दिन ' ... सभापती रामप्पा चिवडशेट्टी यांची माहीती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

साक्षी भैरामडगी वळसंगच्या एक दिवसाच्या सरपंच

साक्षी भैरामडगी वळसंगच्या एक दिवसाच्या सरपंच

June 6, 2026
शिवरायांनी अठरापगड जातींच्या लोकांना एकत्र करून स्वराज्य उभारले- पालकमंत्री

शिवरायांनी अठरापगड जातींच्या लोकांना एकत्र करून स्वराज्य उभारले- पालकमंत्री

June 6, 2026
मंद्रूपच्या तहसीलदारांवर “वाॅच”

औराद महसूल मंडळात अवैध मुरूम उपशाचा धुमाकूळ

June 5, 2026
हयात प्रमाणपत्रासाठी लाभार्थ्यांचे हेलपाटे कमी होणार !

हयात प्रमाणपत्रासाठी लाभार्थ्यांचे हेलपाटे कमी होणार !

June 5, 2026
वारी काळात अधिकारी व कर्मचारी यांना रजा नाही , मोबाईल बंद ठेवल्यास कारवाई – विभागीय आयुक्त शितल तेली – उगले

वारी काळात अधिकारी व कर्मचारी यांना रजा नाही , मोबाईल बंद ठेवल्यास कारवाई – विभागीय आयुक्त शितल तेली – उगले

June 5, 2026
‘गोकुळ’च्या थकीत बिलासाठी शेतकर्‍यांचे अर्धनग्न आंदोलन

‘गोकुळ’च्या थकीत बिलासाठी शेतकर्‍यांचे अर्धनग्न आंदोलन

June 4, 2026
28 हजार 298 परीक्षार्थी देणार टीईटी परीक्षा

28 हजार 298 परीक्षार्थी देणार टीईटी परीक्षा

June 4, 2026
“सावकारां”च्या वाढदिवसाला रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

“सावकारां”च्या वाढदिवसाला रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

June 4, 2026

राजकारण

No Content Available
Load More

वेबसाईट दर्शक