Monday, June 8, 2026
Navprabhatnews
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य
No Result
View All Result
Navprabhatnews
No Result
View All Result

पशूसंवर्धन विभागाला येणार ‘ अच्छे दिन ‘ … सभापती रामप्पा चिवडशेट्टी यांची माहीती

संपादक-अमोगसिध्द मुंजे by संपादक-अमोगसिध्द मुंजे
April 24, 2026
in सोलापूर
0
पशूसंवर्धन विभागाला येणार ‘ अच्छे दिन ‘ … सभापती रामप्पा चिवडशेट्टी यांची माहीती
0
SHARES
107
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सभापती चिवडशेट्टी यांनी घेतला पशूसंवर्धन विभागाचा आढावा

सोलापूर :
जिल्ह्यातील पशुधन संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. ती वाढविण्यासाठी जिल्हा परिषदेच्या पशुसवंर्धन विभागाकडून विविध योजना राबविणार असुन दूध उत्पादन वाढीलाही प्राधान्य देणार असल्याने लवकरच पशूसंवर्धन विभागाला अच्छे दिन येणार असल्याचे जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन सभापती रामप्पा चिवडशेट्टी यांनी सांगितले . सभापती चिवडशेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली पशुसंवर्धन विभागाची गुरुवारी शिवरत्न सभागृहात बैठक झाली. त्यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना पशुधन वाढीसाठी विविध योजना राबविण्याच्या सूचना दिल्या. यावेळी पशूसंवर्धन उपआयुक्त डॉ. अनिल तांबे, सहायक आयुक्त डाॅ. विशाल येवले, डाॅ. स्नेहंका बोधनकर , विषय समिती सदस्य नंदकुर वाघमारे, अस्लम चौधरी, गौतम माने, पृथ्वीराज सावंत, रुपाली गोडसे, विकास बुळ्ळा, निलावती टवरे, वनिता गुळवे उपस्थित होते.
शेतीबरोबर इतर जोडधंदा केल्यास शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. त्यासाठी जिल्ह्यात शेळ्या, मेंढ्यासह कुकूट पालनात योजनेत वाढ करण्यात येणार आहे. त्याचा फायदा शेतकऱ्यांना होणार असून, त्याविषयी लवकरच निर्णय घेण्यात येणार असल्याचे सभापती चिवडशेट्टी यांनी सांगितले.
यावेळी सभापती चिवडशेट्टी म्हणाले की , जिल्ह्यातील पशुवैद्यकीय दवाखान्यांची संख्या किती, किती इमारत धोकादायक झाल्या आहेत. किती इमारती नवीन बांधावे लागणार आहे. जिल्ह्यातील पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या किती जागा रिक्त आहेत, याविषयी माहिती घेण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. ती माहिती आल्यानंतर त्या दृष्टीने कार्यवाही करण्यात येणार आहे.

________________________________

*🛑नवप्रभात न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा*
*संपादक :- अमोगसिद्ध मुंजे*
*9423535294*

Previous Post

आषाढी वारी हायटेक होणार .. सिईओ जैन

Next Post

९३८ भोंग्यांवर कारवाई, ध्वनीप्रदूषण कमी होणार

संपादक-अमोगसिध्द मुंजे

संपादक-अमोगसिध्द मुंजे

Next Post
९३८ भोंग्यांवर कारवाई, ध्वनीप्रदूषण कमी होणार

९३८ भोंग्यांवर कारवाई, ध्वनीप्रदूषण कमी होणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

साक्षी भैरामडगी वळसंगच्या एक दिवसाच्या सरपंच

साक्षी भैरामडगी वळसंगच्या एक दिवसाच्या सरपंच

June 6, 2026
शिवरायांनी अठरापगड जातींच्या लोकांना एकत्र करून स्वराज्य उभारले- पालकमंत्री

शिवरायांनी अठरापगड जातींच्या लोकांना एकत्र करून स्वराज्य उभारले- पालकमंत्री

June 6, 2026
मंद्रूपच्या तहसीलदारांवर “वाॅच”

औराद महसूल मंडळात अवैध मुरूम उपशाचा धुमाकूळ

June 5, 2026
हयात प्रमाणपत्रासाठी लाभार्थ्यांचे हेलपाटे कमी होणार !

हयात प्रमाणपत्रासाठी लाभार्थ्यांचे हेलपाटे कमी होणार !

June 5, 2026
वारी काळात अधिकारी व कर्मचारी यांना रजा नाही , मोबाईल बंद ठेवल्यास कारवाई – विभागीय आयुक्त शितल तेली – उगले

वारी काळात अधिकारी व कर्मचारी यांना रजा नाही , मोबाईल बंद ठेवल्यास कारवाई – विभागीय आयुक्त शितल तेली – उगले

June 5, 2026
‘गोकुळ’च्या थकीत बिलासाठी शेतकर्‍यांचे अर्धनग्न आंदोलन

‘गोकुळ’च्या थकीत बिलासाठी शेतकर्‍यांचे अर्धनग्न आंदोलन

June 4, 2026
28 हजार 298 परीक्षार्थी देणार टीईटी परीक्षा

28 हजार 298 परीक्षार्थी देणार टीईटी परीक्षा

June 4, 2026
“सावकारां”च्या वाढदिवसाला रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

“सावकारां”च्या वाढदिवसाला रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

June 4, 2026

राजकारण

No Content Available
Load More

वेबसाईट दर्शक