Monday, June 8, 2026
Navprabhatnews
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य
No Result
View All Result
Navprabhatnews
No Result
View All Result

झेडपीच्या कामचुकार कर्मचार्‍यांना शिस्त लागणार

संपादक-अमोगसिध्द मुंजे by संपादक-अमोगसिध्द मुंजे
April 24, 2026
in सोलापूर
0
झेडपीच्या कामचुकार कर्मचार्‍यांना शिस्त लागणार
0
SHARES
39
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सीईओ कुशल जैन यांचा ४३ कर्मचर्‍यांना नोटीस

सोलापूर ;

सोलापूर जिल्हा परिषदेचे नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) कुशल जैन यांनी पदभार स्वीकारताच प्रशासनात शिस्त आणण्यास सुरुवात केली आहे. गुरुवार २३ एप्रिल रोजी सकाळी त्यांनी आपल्या निजी कक्षातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याद्वारे कार्यालयात उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांची थेट नोंद घेतली. त्यानंतर संबंधित विभागांकडून हजेरी मस्टर मागवून उशिरा हजर झालेल्या ४३ कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटिसा बजावण्याचे आदेश प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील यांना दिले. यापुढे सर्व कर्मचाऱ्यांनी कार्यालयीन वेळेत उपस्थित राहावे, असे स्पष्ट निर्देश सीईओ जैन यांनी दिले आहेत. तसेच कार्यालयीन वेळ उलटल्यानंतर सलग तीन दिवस उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांची एक दिवसाची गैरहजेरी नोंदविण्यात येईल, अशा सूचना संबंधित विभाग प्रमुखांना देण्यात आल्या आहेत. सीईओ जैन यांच्या या कठोर भूमिकेमुळे उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून, जिल्हा परिषदेत शिस्तीचे वातावरण निर्माण होण्याची चर्चा सुरू आहे.
विभागनिहाय उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या
शिक्षण योजना – ०१
प्राथमिक शिक्षण – ०८
स्वच्छ भारत मिशन – ०७
लघुपाटबंधारे – ०२
कृषी – ०३
ग्रामीण पाणीपुरवठा – ०६
बांधकाम (क्रमांक २) – ०१
पशुसंवर्धन – ०२
माध्यमिक शिक्षण – ०२
समाज कल्याण – ०२
बांधकाम (क्रमांक १) – ०३
आरोग्य विभाग – ०१
ग्रामपंचायत – ०४
अर्थ विभाग – ०१
एकूण – ४३ कर्मचारी

…

__________________________________
*🛑नवप्रभात न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा*
*संपादक :- अमोगसिद्ध मुंजे*
*9423535294*

Previous Post

९३८ भोंग्यांवर कारवाई, ध्वनीप्रदूषण कमी होणार

Next Post

काळजात सरणाची आग अन् डोळ्यात स्वप्नांची मशाल

संपादक-अमोगसिध्द मुंजे

संपादक-अमोगसिध्द मुंजे

Next Post
काळजात सरणाची आग अन् डोळ्यात स्वप्नांची मशाल

काळजात सरणाची आग अन् डोळ्यात स्वप्नांची मशाल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

साक्षी भैरामडगी वळसंगच्या एक दिवसाच्या सरपंच

साक्षी भैरामडगी वळसंगच्या एक दिवसाच्या सरपंच

June 6, 2026
शिवरायांनी अठरापगड जातींच्या लोकांना एकत्र करून स्वराज्य उभारले- पालकमंत्री

शिवरायांनी अठरापगड जातींच्या लोकांना एकत्र करून स्वराज्य उभारले- पालकमंत्री

June 6, 2026
मंद्रूपच्या तहसीलदारांवर “वाॅच”

औराद महसूल मंडळात अवैध मुरूम उपशाचा धुमाकूळ

June 5, 2026
हयात प्रमाणपत्रासाठी लाभार्थ्यांचे हेलपाटे कमी होणार !

हयात प्रमाणपत्रासाठी लाभार्थ्यांचे हेलपाटे कमी होणार !

June 5, 2026
वारी काळात अधिकारी व कर्मचारी यांना रजा नाही , मोबाईल बंद ठेवल्यास कारवाई – विभागीय आयुक्त शितल तेली – उगले

वारी काळात अधिकारी व कर्मचारी यांना रजा नाही , मोबाईल बंद ठेवल्यास कारवाई – विभागीय आयुक्त शितल तेली – उगले

June 5, 2026
‘गोकुळ’च्या थकीत बिलासाठी शेतकर्‍यांचे अर्धनग्न आंदोलन

‘गोकुळ’च्या थकीत बिलासाठी शेतकर्‍यांचे अर्धनग्न आंदोलन

June 4, 2026
28 हजार 298 परीक्षार्थी देणार टीईटी परीक्षा

28 हजार 298 परीक्षार्थी देणार टीईटी परीक्षा

June 4, 2026
“सावकारां”च्या वाढदिवसाला रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

“सावकारां”च्या वाढदिवसाला रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

June 4, 2026

राजकारण

No Content Available
Load More

वेबसाईट दर्शक