Sunday, June 7, 2026
Navprabhatnews
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य
No Result
View All Result
Navprabhatnews
No Result
View All Result

पोलीस दलात नवीन वाहने दाखल

संपादक-अमोगसिध्द मुंजे by संपादक-अमोगसिध्द मुंजे
May 2, 2026
in सोलापूर
0
पोलीस दलात नवीन वाहने दाखल
0
SHARES
4
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

ग्रामीण पोलीस दलाच्या पुढाकारातून जिल्ह्यात ऑरगॅनिक शेतीला चालना -पालकमंत्री

सोलापूर… जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून ग्रामीण पोलीस विभागाला विविध पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. या निधीतून पोलीस विभागाने खरेदी केलेल्या वाहनामुळे पोलीस दलाची कार्यक्षमता अधिक वाढली जाणार आहे त्यामुळे पोलीस दलाने सर्वसामान्य नागरिकांना अधिक गतिमान पद्धतीने सेवा उपलब्ध करून द्याव्यात, असे आवाहन पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केले.
सोलापूर ग्रामीण पोलीस मुख्यालय येथील ओपन लॉन चे उद्घाटन, डॉरमेट्री हॉलचे भूमिपूजन तर पोलीस विभागाच्या विविध वाहनांचे लोकार्पण पालकमंत्री गोरे यांच्या हस्ते झाले, त्याप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दीपक वैद्य, राज्यसभा खासदार ज्योती वाघमारे, महापौर विनायक कोंड्याल, आमदार देवेंद्र कोठे, कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलीस महानिदेशक सुनील फुलारी, जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन, पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर आदी उपस्थित होते.
प्रारंभी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी जिल्हा नियोजन समितीतून वाहनासाठी 95 लाख, ओपन लॉन साठी 45 लाख तर डॉरमेट्री हॉल साठी एक कोटी 34 लाख उपलब्ध करून दिलेले आहेत अशी माहिती दिली. यामुळे पोलीस मुख्यालयाच्या अधोरेखित पायाभूत सुविधांना बळकटी मिळणार आहे.

ग्रामीण पोलीस दलाच्या विशेषता पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या प्रयत्नातून सोलापूर जिल्ह्यात वृक्ष लागवडी बरोबरच ऑरगॅनिक शेतीला प्राधान्य दिले जात आहे. पोलीस विभाग जिल्ह्यातील सर्व पोलीस पाटलांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील नागरिकांना ऑरगॅनिक शेतीचे महत्व सांगून ती शेती करण्यासाठी प्रोत्साहन देत आहेत. सध्या शेतीचे उत्पादन वाढवणे तसेच शेती पिकाला कीड लागू नये म्हणून मोठ्या प्रमाणावर रसायने फवारली जात आहेत, त्यातून कॅन्सर सारख्या आजाराचे प्रमाणात वाढ झाल्याचे निर्देशनास आलेले आहे. त्यामुळे ग्रामीण पोलीस दलाने ऑरगॅनिक शेतीला दिलेली चालना हा एक चांगला उपक्रम असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केले.
ग्रामीण पोलीस विभागाकडून पोलीस मुख्यालयाच्या शेजारी पेट्रोल पंप चालवला जातो त्या ठिकाणी आयोजित ऑरगॅनिक भाज्या व फळांच्या स्टॉलचे उद्घाटन पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते झाले, त्याप्रसंगी ते बोलत होते.
__________

नवप्रभात न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा.

संपादक :- अमोगसिद्ध मुंजे
9423535294

Previous Post

बोरामणीत कौटुंबिक वादातून तिहेरी हत्याकांड ?

Next Post

पीर शेखसाहेब ऊरूसनिमित्त शनिवारी जंगी कुस्त्यांचे आयोजन

संपादक-अमोगसिध्द मुंजे

संपादक-अमोगसिध्द मुंजे

Next Post
पीर शेखसाहेब ऊरूसनिमित्त शनिवारी जंगी कुस्त्यांचे आयोजन

पीर शेखसाहेब ऊरूसनिमित्त शनिवारी जंगी कुस्त्यांचे आयोजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

साक्षी भैरामडगी वळसंगच्या एक दिवसाच्या सरपंच

साक्षी भैरामडगी वळसंगच्या एक दिवसाच्या सरपंच

June 6, 2026
शिवरायांनी अठरापगड जातींच्या लोकांना एकत्र करून स्वराज्य उभारले- पालकमंत्री

शिवरायांनी अठरापगड जातींच्या लोकांना एकत्र करून स्वराज्य उभारले- पालकमंत्री

June 6, 2026
मंद्रूपच्या तहसीलदारांवर “वाॅच”

औराद महसूल मंडळात अवैध मुरूम उपशाचा धुमाकूळ

June 5, 2026
हयात प्रमाणपत्रासाठी लाभार्थ्यांचे हेलपाटे कमी होणार !

हयात प्रमाणपत्रासाठी लाभार्थ्यांचे हेलपाटे कमी होणार !

June 5, 2026
वारी काळात अधिकारी व कर्मचारी यांना रजा नाही , मोबाईल बंद ठेवल्यास कारवाई – विभागीय आयुक्त शितल तेली – उगले

वारी काळात अधिकारी व कर्मचारी यांना रजा नाही , मोबाईल बंद ठेवल्यास कारवाई – विभागीय आयुक्त शितल तेली – उगले

June 5, 2026
‘गोकुळ’च्या थकीत बिलासाठी शेतकर्‍यांचे अर्धनग्न आंदोलन

‘गोकुळ’च्या थकीत बिलासाठी शेतकर्‍यांचे अर्धनग्न आंदोलन

June 4, 2026
28 हजार 298 परीक्षार्थी देणार टीईटी परीक्षा

28 हजार 298 परीक्षार्थी देणार टीईटी परीक्षा

June 4, 2026
“सावकारां”च्या वाढदिवसाला रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

“सावकारां”च्या वाढदिवसाला रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

June 4, 2026

राजकारण

No Content Available
Load More

वेबसाईट दर्शक