Thursday, September 17, 2026
Navprabhatnews
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य
No Result
View All Result
Navprabhatnews
No Result
View All Result

कर्ज नाकारल्यास बँकेने लेखी कारण कळवावे.. जिल्हाधिकारी कार्तिकेयन

संपादक-अमोगसिध्द मुंजे by संपादक-अमोगसिध्द मुंजे
May 22, 2026
in सोलापूर
0
कर्ज नाकारल्यास बँकेने लेखी कारण कळवावे.. जिल्हाधिकारी कार्तिकेयन
0
SHARES
33
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

जिल्हास्तरीय बँक सल्लागार समितीची बैठक संपन्न

सोलापूर — ज्या लाभार्थ्यांचे कर्ज नाकारले जाते, त्यांना बँकेने लेखी स्वरूपात नेमके कारण कळविण्याचे निर्देश जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांनी दिले. तसेच सर्व बँकांनी जबाबदारीने कामकाज करून उद्दिष्टपूर्ती साध्य करणे आवश्यक असल्याचे जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी सांगितले . जिल्हास्तरीय बँक सल्लागार समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या बैठकीस जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक तसेच सर्व बँकांचे अधिकारी उपस्थित होते. बैठकीत कर्जवितरणाची प्रगती, खातेउघडणीचे कामकाज आणि समितीने बँकांसमोर ठेवलेल्या उद्दिष्टांची अंमलबजावणी यांचा सखोल आढावा घेण्यात आला.
सर्व बँकांनी नेमून दिलेले उद्दीष्ट शंभर टक्के पूर्ण करणे बंधनकारक आहे . उद्दिष्टपूर्ती वेळेत साध्य करण्यासाठी प्रभावी नियोजन करण्यावर भर देण्यात यावे . तसेच प्रत्येक बँकेने 75 टक्के खाते उघडणीचे उद्दिष्ट पूर्ण करावे, अशी सूचना करण्यात आली. अनेक बँकांच्या कामकाजा बाबत असमाधान व्यक्त करून ठरवून दिलेले पीक कर्ज पूर्ण न करणे किंवा शासकीय योजना राबविण्यात झालेल्या दिरंगाईबाबत ॲक्सिस बँक, इंडियन ओव्हरसीज बँक, बंधन बँक आणि करूर वैश्य बँक यांना जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक यांनी नोटीस काढण्याचे निर्देश जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांनी दिले.
बैठकीत नाबार्ड, ओबीसी महामंडळ, कृषी विभाग आणि जिल्हा उद्योग केंद्र (DIC) यांचा आढावा घेण्यात आला. योजनांची प्रगती, निधी उपलब्धतेची स्थिती तसेच अंमलबजावणीत येणाऱ्या अडचणींवर चर्चा झाली. कर्ज मंजुरी किंवा नकार प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यावर भर देण्यात आला.
यावेळी जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक राम वाखार्डे, बँक अधिकारी कदम , जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले, महा व्यवस्थापक जिल्हा उद्योग केंद्र उमेशचंद्र दंडगव्हाळ, ओबीसी वित्त-विकास महामंडळ च्या जिल्हा व्यवस्थापक वृषाली लहारे यांच्या सह सर्व राष्ट्रीयकृत खाजगी व सहकारी बँकांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
—————————————
नवप्रभात न्युज पोर्टलला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा.
संपादक :- अमोगसिद्ध मुंजे
9423535294

Previous Post

कलाकारांच्या सुचनेनुसार नाट्यगृह उभारणार .

Next Post

जिल्हाधिकार्‍यांच्या नावाने “फेक अकाऊंट” , नागरीकांनी दक्ष राहण्याचे आवाहन

संपादक-अमोगसिध्द मुंजे

संपादक-अमोगसिध्द मुंजे

Next Post
जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची नागपूरला बदली

जिल्हाधिकार्‍यांच्या नावाने "फेक अकाऊंट" , नागरीकांनी दक्ष राहण्याचे आवाहन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सेवा संकल्प अभियानाचे पहिले “मानकरी” ठरले शिक्षक

सेवा संकल्प अभियानाचे पहिले “मानकरी” ठरले शिक्षक

September 17, 2026
न्यायासाठी भटक्या समाजावर ऊन्हातच उपोषण करण्याची वेळ !

कंदलगावात मारहाण करून जबरी चोरी

September 17, 2026
दक्षिण पंचायतीपासून “सेवा संकल्प अभियान” सुरू

दक्षिण पंचायतीपासून “सेवा संकल्प अभियान” सुरू

September 17, 2026
“ट्रॉय”चे श्रीकांत भरले यांची तालुका अध्यक्षपदी निवड

“ट्रॉय”चे श्रीकांत भरले यांची तालुका अध्यक्षपदी निवड

September 17, 2026
“स्वच्छता ही सेवा” अभियान यशस्वीपणे राबवा. सीईओ कुशल जैन

“स्वच्छता ही सेवा” अभियान यशस्वीपणे राबवा. सीईओ कुशल जैन

September 16, 2026
माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांची उडाली तारांबळ

माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांची उडाली तारांबळ

September 16, 2026
तात्काळ “दक्षिण तालुका”  दुष्काळ जाहीर करा.

तात्काळ “दक्षिण तालुका” दुष्काळ जाहीर करा.

September 16, 2026
उद्घाटन कार्यक्रमात लोकप्रतिनिधींचा अपमान !

उद्घाटन कार्यक्रमात लोकप्रतिनिधींचा अपमान !

September 15, 2026

राजकारण

No Content Available
Load More

वेबसाईट दर्शक

136506

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य

© Website Design by Digital Buffalo - 9028927697