Thursday, September 17, 2026
Navprabhatnews
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य
No Result
View All Result
Navprabhatnews
No Result
View All Result

न्यायासाठी भटक्या समाजावर ऊन्हातच उपोषण करण्याची वेळ !

दीड महिन्यानंतरही बेपत्ता मुलीला शोधण्यात मंद्रूप पोलीसांना अपयश

संपादक-अमोगसिध्द मुंजे by संपादक-अमोगसिध्द मुंजे
May 25, 2026
in सोलापूर
0
न्यायासाठी भटक्या समाजावर ऊन्हातच उपोषण करण्याची वेळ !

filter: 0; fileterIntensity: 0.0; filterMask: 0; captureOrientation: 0; brp_mask:0; brp_del_th:null; brp_del_sen:null; delta:null; module: photo;hw-remosaic: false;touch: (-1.0, -1.0);sceneMode: 8;cct_value: 0;AI_Scene: (-1, -1);aec_lux: 0.0;aec_lux_index: 0;albedo: ;confidence: ;motionLevel: -1;weatherinfo: null;temperature: 46;

0
SHARES
69
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मरीआईवाले समाजाचा न्यायासाठी पोलीस स्टेशन समोर उपोषण

मंद्रूप…
दीड महिन्यापूर्वी मंद्रूपमधील
लक्ष्मण मरीआईवले यांच्या मुलीचे अपहरण झाले. मंद्रूप पोलीसात अपहरण केलेल्या व्यक्तीविरोधात तक्रार करूनही अद्याप मुलीचा शोध लागला नाही . मंद्रूप पोलीस राजकीय दबावामुळे अपहरण केलेल्या व्यक्तीविरोधात कारवाई न करता बघ्याची भूमिका घेत आहेत. त्यामुळे अपहरण झालेल्या मुलीच्या कुटुंबावर अन्याय होत असल्यामुळे मरीआईवाले समाज न्याय मागणीसाठी ऊन्हामध्येच मंद्रूप पोलीस ठाणेच्या प्रवेशव्दारासमोर उपोषणास बसला आहे.
मंद्रूपमधील इंदिरानगर येथे राहणार्‍या लक्ष्मण मरीआईवाले यांच्या मुलीचे शौचालयास गेल्यानंतर अपहरण करण्यात आले. अपहरण करणार्‍या व्यक्तीविरोधात तक्रार करूनही मंद्रूप पोलीस संबंधित व्यक्तिविरूध्द कारवाई न करता टाळाटाळ करीत आहेत. त्यामुळे तपास करणार्‍या अधिकारीविरोधात पोलीस अधीक्षकांकडे तक्रार करण्यात आले. त्यानंतर ६ मे रोजी मषद्रूप पोलीस ठाणेसमोर उपोषणास बसल्यानंतर पोलीस अधिकारी यांनी तपास करून आठ दिवसात मुलीचा शोध घेण्याची ग्वाही दिल्यानंतर उपोषण स्थगित करण्यात आले. मात्र तीन आठवड्यानंतरही पोलीस निरीक्षकांकडून न्याय न मिळाल्याने मरीआईवाले समाजांनी मंद्रूप पोलीस ठाणेच्या प्रवेशव्दारासमोर उपोषण सुरू केला आहे. त्यामुळे मंद्रुप पोलीसांची धावपळ सुरू झाली आहे. पोलीस उपनिरीक्षक राजकुमार डांगे व गोपनीय शाखेचे पोलीस सागर चव्हाण यांनी उपोषण करणार्‍या पदाधिकार्‍यांशी चर्चा केली. मात्र मुलीचे अपहरण करणार्‍यांविरोधात कारवाई व मुलगी ताब्यात मिळेपर्यंत उपोषण करणार असल्याचे मरीआईवाले समाजाच्या महिलांनी सांगितले.

 

 

….
भटका समाज न्यायापासून वंचितच
…
मरीआईवाले समाज भटका असून दररोज उदरनिर्वाहासाठी भटकंती करतो. विकासाच्या योजनापासून वंचित असणार्‍या मरीआईवाले समाजाला न्यायासाठी दररोज मंद्रूप पोलीस ठाणेला चकरा मारावे लागत आहे. त्यामुळे भटक्या समाजाला न्याय कधी मिळणार ? असा सवाल मशप्पा मरीआईवाले यांनी उपस्थित केला आहे.

__________________________________
*🛑नवप्रभात न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा*
*संपादक :- अमोगसिद्ध मुंजे*
*9423535294*

Previous Post

वीज पडून मंद्रूपमध्ये बैलाचे मृत्यू

Next Post

जिल्हाधिकारी यांच्या नावाने “फेक” अकाउंट

संपादक-अमोगसिध्द मुंजे

संपादक-अमोगसिध्द मुंजे

Next Post
जिल्हाधिकारी यांच्या नावाने “फेक” अकाउंट

जिल्हाधिकारी यांच्या नावाने "फेक" अकाउंट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सेवा संकल्प अभियानाचे पहिले “मानकरी” ठरले शिक्षक

सेवा संकल्प अभियानाचे पहिले “मानकरी” ठरले शिक्षक

September 17, 2026
न्यायासाठी भटक्या समाजावर ऊन्हातच उपोषण करण्याची वेळ !

कंदलगावात मारहाण करून जबरी चोरी

September 17, 2026
दक्षिण पंचायतीपासून “सेवा संकल्प अभियान” सुरू

दक्षिण पंचायतीपासून “सेवा संकल्प अभियान” सुरू

September 17, 2026
“ट्रॉय”चे श्रीकांत भरले यांची तालुका अध्यक्षपदी निवड

“ट्रॉय”चे श्रीकांत भरले यांची तालुका अध्यक्षपदी निवड

September 17, 2026
“स्वच्छता ही सेवा” अभियान यशस्वीपणे राबवा. सीईओ कुशल जैन

“स्वच्छता ही सेवा” अभियान यशस्वीपणे राबवा. सीईओ कुशल जैन

September 16, 2026
माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांची उडाली तारांबळ

माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांची उडाली तारांबळ

September 16, 2026
तात्काळ “दक्षिण तालुका”  दुष्काळ जाहीर करा.

तात्काळ “दक्षिण तालुका” दुष्काळ जाहीर करा.

September 16, 2026
उद्घाटन कार्यक्रमात लोकप्रतिनिधींचा अपमान !

उद्घाटन कार्यक्रमात लोकप्रतिनिधींचा अपमान !

September 15, 2026

राजकारण

No Content Available
Load More

वेबसाईट दर्शक

136506

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य

© Website Design by Digital Buffalo - 9028927697