Wednesday, July 1, 2026
Navprabhatnews
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य
No Result
View All Result
Navprabhatnews
No Result
View All Result

प्रभाग २५ मध्ये वैभव हत्तुरे यांना युवा व महिला वर्गाचा मिळतोय पाठिंबा.

संपादक-अमोगसिध्द मुंजे by संपादक-अमोगसिध्द मुंजे
January 12, 2026
in सोलापूर
0
प्रभाग २५ मध्ये वैभव हत्तुरे यांना युवा व महिला वर्गाचा मिळतोय पाठिंबा.
0
SHARES
19
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

विकासकामांमुळे निवडून देण्याचा निर्धार

सोलापूर …  महानगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी सध्या शिगेला पोहोचली असून, प्रभाग २५ मधील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या प्रभागात सर्वच राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी प्रचाराचा धडाका लावला असला तरी, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे अधिकृत उमेदवार वैभव हत्तुरे यांना मतदारांचा मिळणारा पाठिंबा लक्षणीय ठरत आहे. विशेषतः या भागातील युवा पिढी आणि महिला वर्गाने हत्तुरे यांना विकासकामांमुळे निवडून देण्याचा निर्धार केला आहे.

प्रभाग २५ मधील सुशिक्षित आणि कष्टकरी युवा पिढीने यंदा परिवर्तनाची लाट आणण्याचे ठरवले आहे. वैभव हत्तुरे यांच्या जनसंपर्काची पद्धत आणि युवकांच्या प्रश्नांची असलेली जाण यामुळे तरुण वर्ग त्यांच्याकडे आकर्षित झाला आहे. “आमच्या प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि तरुणांच्या हाताला काम मिळवून देण्यासाठी वैभव हत्तुरे यांच्यासारख्या अभ्यासू नेतृत्वाची गरज आहे,” अशा भावना येथील स्थानिक तरुणांकडून व्यक्त करण्यात येत आहेत.

वैभव हत्तुरे यांना केवळ युवा पिढीच नव्हे, तर महिला वर्गाचाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. प्रचार दौऱ्यादरम्यान महिलांनी त्यांचे औक्षण करून विजयाचा आशीर्वाद दिला. प्रभागातील रस्ते, पाणी, आरोग्य आणि सुरक्षा या प्रश्नांवर हत्तुरे यांनी दिलेले ठोस आश्वासन महिलांना भावले आहे. “वैभव हत्तुरे हे आमच्या सुख-दु:खात धावून येणारे व्यक्तिमत्व आहे, त्यामुळे त्यांना यावेळेस मोठ्या मताधिक्याने विजयी करणारच,” असा निर्धार महिलांनी व्यक्त केला आहे.
प्रभाग २५ मध्ये वैभव हत्तुरे यांनी घरोघरी जाऊन मतदारांशी संवाद साधण्यावर भर दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट च्या माध्यमातून शहराचा आणि प्रभागाचा कायापालट करण्याचा मानस त्यांनी बोलून दाखवला आहे. वाढत्या जनसमर्थनामुळे विरोधकांच्या गोटात अस्वस्थता पसरली असून, हत्तुरे यांचे पारडे सध्या जड असल्याचे चित्र दिसत आहे.

Previous Post

सोलापूरमध्ये यादिवशी मद्यविक्रीस मनाई

Next Post

दक्षिण तालुक्यातील ‘या’ पतसंस्थेचा होतोय कौतुक

संपादक-अमोगसिध्द मुंजे

संपादक-अमोगसिध्द मुंजे

Next Post
दक्षिण तालुक्यातील ‘या’ पतसंस्थेचा होतोय कौतुक

दक्षिण तालुक्यातील 'या' पतसंस्थेचा होतोय कौतुक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

३३ वर्षे निष्कलंक सेवा करून ‘अण्णा’ सेवानिवृत्त”

३३ वर्षे निष्कलंक सेवा करून ‘अण्णा’ सेवानिवृत्त”

June 30, 2026
 १४ कोटींची योजना तरी कुठे हरवली ? मंद्रूपकरांची तहान कायम !  

मंद्रूप ग्रामपंचायतीच्या निष्काळजीपणामुळे दक्षिणचे बीडीओ पोहोचले तक्रारदारांच्या दारी

June 29, 2026
वास्तुविशारद तयार करणार श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसर आराखडा  – पालकमंत्री जयकुमार गोरे

वास्तुविशारद तयार करणार श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसर आराखडा – पालकमंत्री जयकुमार गोरे

June 28, 2026
सोलापूर विमा कवच पॅटर्न राज्यात राबविणार – पालकमंत्री जयकुमार गोरे

सोलापूर विमा कवच पॅटर्न राज्यात राबविणार – पालकमंत्री जयकुमार गोरे

June 28, 2026
आषाढी वारीत व्हीआयपी दर्शन बंद – पालकमंत्री जयकुमार गोरे

आषाढी वारीत व्हीआयपी दर्शन बंद – पालकमंत्री जयकुमार गोरे

June 28, 2026
गाय व बैलांच्या ‘खांदेमळणी’साठी वरूणराजाची हजेरी

गाय व बैलांच्या ‘खांदेमळणी’साठी वरूणराजाची हजेरी

June 28, 2026
दुष्काळ निवारणासाठी मुस्लिम समाजाचे ‘सलातुल इस्तिस्का’ची प्रार्थना

दुष्काळ निवारणासाठी मुस्लिम समाजाचे ‘सलातुल इस्तिस्का’ची प्रार्थना

June 28, 2026
पुणे विभागातील २२ शेतकऱ्यांना विविध कृषी पुरस्कार जाहीर

पुणे विभागातील २२ शेतकऱ्यांना विविध कृषी पुरस्कार जाहीर

June 27, 2026

राजकारण

No Content Available
Load More

वेबसाईट दर्शक