Tuesday, October 27, 2026
Navprabhatnews
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य
No Result
View All Result
Navprabhatnews
No Result
View All Result

नवकवींनो, तयार व्हा ! रविवारी मिळणार कविता लेखनाचा ‘महामंत्र’!

संपादक-अमोगसिध्द मुंजे by संपादक-अमोगसिध्द मुंजे
October 2, 2026
in सोलापूर
0
नवकवींनो, तयार व्हा ! रविवारी मिळणार कविता लेखनाचा ‘महामंत्र’!
0
SHARES
49
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

समरसता साहित्य परिषदेची मोठी संधी 

पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते कार्यशाळेचे उद्घाटन!

सोलापूर – कविता लिहिता लिहिता अडकतंय का? कवितेचा छंद जुळत नाहीये का? मग ही बातमी तुमच्यासाठीच!
       समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र प्रदेश,   महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ मुंंबईच्या वतीने अभिजात मराठी भाषा सप्ताहानिमित्त नवलेखक-नवकवींसाठी रविवारी ४ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वा. कार्यशाळा होणार आहे. ही कार्यशाळा रेल्वे लाईन, डफरीन चौक येथील सारस्वत ब्राह्मण सोशल क्लब येथे होणार आहे, अशी माहिती कार्यशाळा प्रमुख गझलकार सुहास घुमरे व सोलापूर शाखेचे अध्यक्ष प्रा. माधव कुलकर्णी यांनी दिली.
कार्यशाळेचे उद्घाटन पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते होणार असून, अध्यक्षस्थानी अक्कलकोटचे आ. सचिन कल्याणशेट्टी राहणार आहेत. यावेळी समरसता साहित्य परिषदेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष डॉ. ईश्वर नंदापुरे, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापिठाचे सहाय्यक कुलसचिव डॉ. शिवाजी शिंदे उपस्थित राहणार आहेत. दुपारी ४.३० वा. होणाऱ्या समारोप सत्रात समरसता साहित्य परिषदेचे कार्यवाह डॉ. प्रसन्न पाटील, सुनील ढेंगळे हे मार्गदर्शन करणार आहेत. यासाठी डॉ. दुर्गा जोशी, पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे उपाध्यक्ष जगन्नाथ हुक्केरी, जनता बँकेच्या संचालिका गौरी आमडेकर, प्रा. संतोष जाधव,आनंद धडके, ऐश्वर्या धडके, श्र्ाद्धा रोडगे, मदन जवळेकर, अमृता कल्याणी, रुपा कुताटे, विजयकुमार सोनवणे हे परिश्रम घेत आहेत. भूमिका डॉ. गजानन होडे हे मांडणार आहेत.

मान्यवरांकडून कविता लेखनाचा मिळणार महामंत्र

या कार्यशाळेत कवितेतील छंद-वृत्तांचे महत्त्व डॉ. राजेंद्र नाईकवाडे, कवितेची शब्दकळा डॉ. विजय राठोड, काव्यातील प्रतिमासृष्टी डॉ. रमा गर्गे, भावना-विचारांची अभिव्यक्ती यावर कवयित्री मृणाल देशपांडे मार्गदर्शन करणार आहेत. गटचर्चेत काशीनाथ पवार, मानसी चिटणीस, डॉ. वैशाली मोहिते, नरेंद्र गुंडेली, दत्तात्रय इंगळे, सुहास घुमरे, विजय मोरे, विनायक कुलकर्णी, हेमा पाटील, आनंद हरी, सुधाकर ईनामदार हे नवकवींना कविता लेखनाचा महामंत्र देणार आहेत.
________________
*बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा -*
*संपादक :- अमोगसिद्ध मुंजे*
*मो. 9423535294*

Previous Post

बिबीदारफळचा ३८ वा रविवार ठरला महाराष्ट्रासाठी आदर्श!

Next Post

छावणी नको, अनुदान द्या! – दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांचे जिल्हाधिकाऱ्यांसमोर साकडे!

संपादक-अमोगसिध्द मुंजे

संपादक-अमोगसिध्द मुंजे

Next Post
छावणी नको, अनुदान  द्या! – दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांचे जिल्हाधिकाऱ्यांसमोर साकडे!

छावणी नको, अनुदान द्या! - दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांचे जिल्हाधिकाऱ्यांसमोर साकडे!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सोलापुरात निघाली “बांगडी”  म्हशीची अंत्ययात्रा

जाणून घ्या, पदवीधर आणि शिक्षक आमदार मतमोजणी पद्धत

October 26, 2026
महर्षी वाल्मिकी जयंती सोलापुरात उत्साहात

महर्षी वाल्मिकी जयंती सोलापुरात उत्साहात

October 26, 2026
तुळजापूरला पायी जाणाऱ्या भाविकांसाठी श्री सोमेश्वर पतसंस्थेचा महाप्रसाद

तुळजापूरला पायी जाणाऱ्या भाविकांसाठी श्री सोमेश्वर पतसंस्थेचा महाप्रसाद

October 23, 2026
कंदलगाव येथे २८ लाखांचा गुटखा जप्त

कंदलगाव येथे २८ लाखांचा गुटखा जप्त

October 22, 2026
सोलापुरात निघाली “बांगडी”  म्हशीची अंत्ययात्रा

सोलापुरात निघाली “बांगडी” म्हशीची अंत्ययात्रा

October 22, 2026
खत खरेदी-विक्रीसाठी QR कोड बंधनकारक

खत खरेदी-विक्रीसाठी QR कोड बंधनकारक

October 21, 2026
किसान सभेचे ठिय्या आंदोलन

किसान सभेचे ठिय्या आंदोलन

October 20, 2026
जिल्हाधिकारी यांच्या नावाने “फेक” अकाउंट

जप्ती केल्यास कठोर कारवाई ! जिल्हाधिकारी यांचा मायक्रो फायनान्स कंपन्यांना दम

October 19, 2026

राजकारण

No Content Available
Load More

वेबसाईट दर्शक

153341

वृत्त संग्रह

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • About Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य

© Website Design by Digital Buffalo - 9028927697