Tuesday, October 27, 2026
Navprabhatnews
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य
No Result
View All Result
Navprabhatnews
No Result
View All Result

छावणी नको, अनुदान द्या! – दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांचे जिल्हाधिकाऱ्यांसमोर साकडे!

जिल्हाधिकारी यांच्याकडून सरसकट पंचनाम्याचे आदेश

संपादक-अमोगसिध्द मुंजे by संपादक-अमोगसिध्द मुंजे
October 2, 2026
in सोलापूर
0
छावणी नको, अनुदान  द्या! – दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांचे जिल्हाधिकाऱ्यांसमोर साकडे!
0
SHARES
79
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

जिल्हाधिकारी यांच्याकडून मंगळवेढा-सांगोला तालुक्यात दुष्काळी परिस्थितीची  पाहणी;

सोलापूर  : जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी आज मंगळवेढा व सांगोला तालुक्यातील विविध गावांना भेटी देऊन पिकांचे नुकसान, पाणीटंचाई, कोरड्या पडलेल्या विहिरी तसेच जनावरांसाठी उपलब्ध चाऱ्याची पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी व मागण्या जाणून घेतल्या. तसेच पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना सरसकट पंचनामे करून नुकसानीची वस्तुनिष्ठ व अचूक नोंद घेण्याच्या सूचना दिल्या.पिकांच्या नुकसानीपोटी मिळणारे अनुदान थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करावे, पिण्याच्या पाण्याचे व जनावरांसाठी पाणी व चाऱ्याचे नियोजन करावे. चाऱ्याची कमतरता निर्माण झाल्यास चाऱ्यासाठीचे अनुदानही थेट बँक खात्यात द्यावे. चारा डेपो किंवा चारा छावण्या सुरू करण्याऐवजी थेट आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली.

  मंगळवेढा तालुक्यातील गणेशवाडी, आंधळगाव, लेंडवे चिंचोळी आणि शिरसी या गावांना जिल्हाधिकाऱ्यांनी भेट देऊन दुष्काळी परिस्थितीची पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन पिकांच्या नुकसानीची पाहणी केली. तसेच कोरड्या पडलेल्या विहिरी, पाण्याची उपलब्धता आणि जनावरांसाठी उपलब्ध चाऱ्याची माहिती घेतली.
लेंडवे चिंचोळी येथे टँकरद्वारे सुरू असलेल्या पाणीपुरवठ्याची जिल्हाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. टँकरमधून नागरिकांना नियमित व पुरेशा प्रमाणात पाणीपुरवठा होत आहे किंवा नाही, याची माहिती घेतली. तसेच पाणीपुरवठ्यासाठी वापरण्यात येणाऱ्या टँकरला जीपीएस यंत्रणा बसविण्यात आली आहे किंवा नाही, याचीही त्यांनी प्रत्यक्ष तपासणी केली. पाणीटंचाईग्रस्त गावांमध्ये नागरिकांना नियोजित वेळेनुसार व आवश्यकतेनुसार पाणीपुरवठा करण्याच्या सूचना संबंधित यंत्रणेला दिल्या.
यानंतर जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी सांगोला तालुक्यातील वाकी(घेरडी), बुरलेवाडी, वाडेगाव, वाणीचिंचोळी आणि राजापूर या गावांना भेटी देऊन दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेतला. पिकांची स्थिती, पाण्याची उपलब्धता, विहिरींची पाणीपातळी, जनावरांसाठी उपलब्ध चारा तसेच पाणीटंचाईग्रस्त गावांमध्ये सुरू असलेल्या उपाययोजनांची माहिती घेतली. दुष्काळी परिस्थितीत नागरिकांना पिण्याचे पाणी, जनावरांसाठी चारा तसेच इतर आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी संबंधित विभागांनी समन्वयाने कार्यवाही करावी, असे निर्देशही त्यांनी दिले.
यावेळी मंगळवेढा तहसीलदार मदन जाधव, सांगोला तहसीलदार बाळूबाई भागवत, मंगळवेढा तालुका कृषी अधिकारी मनीषा मिसाळ, सांगोला तालुका कृषी अधिकारी दिपाली जाधव, मंडल अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक तसेच संबंधित गावांतील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
________________
*बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा -*
*संपादक :- अमोगसिद्ध मुंजे*
*मो. 9423535294*

Previous Post

नवकवींनो, तयार व्हा ! रविवारी मिळणार कविता लेखनाचा ‘महामंत्र’!

Next Post

मंद्रूपच्या शेतात प्रशासन! नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे सुरू,

संपादक-अमोगसिध्द मुंजे

संपादक-अमोगसिध्द मुंजे

Next Post
मंद्रूपच्या शेतात प्रशासन!  नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे सुरू,

मंद्रूपच्या शेतात प्रशासन! नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे सुरू,

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सोलापुरात निघाली “बांगडी”  म्हशीची अंत्ययात्रा

जाणून घ्या, पदवीधर आणि शिक्षक आमदार मतमोजणी पद्धत

October 26, 2026
महर्षी वाल्मिकी जयंती सोलापुरात उत्साहात

महर्षी वाल्मिकी जयंती सोलापुरात उत्साहात

October 26, 2026
तुळजापूरला पायी जाणाऱ्या भाविकांसाठी श्री सोमेश्वर पतसंस्थेचा महाप्रसाद

तुळजापूरला पायी जाणाऱ्या भाविकांसाठी श्री सोमेश्वर पतसंस्थेचा महाप्रसाद

October 23, 2026
कंदलगाव येथे २८ लाखांचा गुटखा जप्त

कंदलगाव येथे २८ लाखांचा गुटखा जप्त

October 22, 2026
सोलापुरात निघाली “बांगडी”  म्हशीची अंत्ययात्रा

सोलापुरात निघाली “बांगडी” म्हशीची अंत्ययात्रा

October 22, 2026
खत खरेदी-विक्रीसाठी QR कोड बंधनकारक

खत खरेदी-विक्रीसाठी QR कोड बंधनकारक

October 21, 2026
किसान सभेचे ठिय्या आंदोलन

किसान सभेचे ठिय्या आंदोलन

October 20, 2026
जिल्हाधिकारी यांच्या नावाने “फेक” अकाउंट

जप्ती केल्यास कठोर कारवाई ! जिल्हाधिकारी यांचा मायक्रो फायनान्स कंपन्यांना दम

October 19, 2026

राजकारण

No Content Available
Load More

वेबसाईट दर्शक

153313

वृत्त संग्रह

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • About Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य

© Website Design by Digital Buffalo - 9028927697