दुष्काळग्रस्तांना तात्काळ मदत देण्यासाठी महसूल, कृषी आणि ग्रामसेवकांची टीम बांधावर!
दक्षिण सोलापूर- मंद्रूप परिसरात पावसाअभावी व दुष्काळामुळे नुकसान झालेल्या शेतीचे पंचनामे अखेर सुरू झाले आहेत. शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत मिळावी यासाठी महसूल , कृषी आणि ग्रामपंचायत विभागाचे अधिकारी व कर्मचारी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी करत आहेत. यावेळी पिकांची स्थिती, झालेल्या नुकसानीची व्याप्ती, विहिरीतील पाणीसाठा आणि चारा टंचाईचा आढावा घेतला जात आहे. सरसकट व अचूक पंचनामा करून शासनाकडे प्रस्ताव पाठवला जाणार आहे. तलाठी रावसाहेब कोकरे, सहाय्यक कृषी अधिकारी रमेश फरताडे व ग्रामसेवक प्रवीण कुमार घाडगे शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानग्रस्त पिकांची पाहणी करीत आहेत.
पंचनाम्याची प्रक्रिया वेगवान करण्यासाठी शेतकऱ्यांनी आपले सातबारा, ८अ, आधार कार्ड, बँक पासबुक फार्मर आयडी व मोबाईल नंबर त्वरित तलाठी कार्यालयाकडे जमा करावीत, असे आवाहन मंद्रूपचे तलाठी रावसाहेब कोकरे यांनी केला आहे. जेणेकरून अनुदान थेट बँक खात्यात जमा करण्याची प्रक्रिया जलद होईल.
शेतकऱ्यांनी प्रशासनाला सहकार्य करावे आणि आपल्या शेतातील नुकसानीची माहिती तात्काळ नोंदवावी, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी अवधूत मुळे यांनी केला आहे.
________________
*बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा -*
*संपादक :- अमोगसिद्ध मुंजे*
*मो. 9423535294*












