ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनीच स्पर्धा परीक्षा गाजवायची!.. बीडीओ मनोज राऊत
दक्षिण सोलापूर – शिष्यवृत्ती परीक्षेत तालुक्याचा झेंडा फडकवायचा! या जिद्दीने पंचायत समितीच्या शिक्षण विभागाने कंबर कसली आहे. इयत्ता चौथी व सातवी शिष्यवृत्ती परीक्षा २०२७ साठी तालुक्यात विशेष कार्यशाळांना उत्स्फूर्त सुरुवात झाली आहे. या कार्यशाळेला गटविकास अधिकारी मनोज राऊत यांनी भेट देऊन शिक्षकांना मोलाचा सल्ला दिला. “प्रश्नपत्रिका सोडवण्याची ट्रिक, नियमित सराव आणि विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करा, ग्रामीण पोरंही मोठी भरारी घेऊ शकतात,” असे बीडीओ मनोज राऊत म्हणाले.
इयत्ता ४ थी साठी – लोकसेवा हायस्कूल, मंद्रूप व इयत्ता ७ वी साठी मार्कंडेय हायस्कूल, कुंभारी येथे कार्यशाळा घेण्यात आली.
मंद्रूप पगार बीट अंतर्गत सहा केंद्रांतील शिक्षकांनी या कार्यशाळेत सहभाग घेतला. मराठी, गणित, इंग्रजी, बुद्धिमत्ता आणि शंका समाधान यावर विषयतज्ज्ञ मार्गदर्शन करत आहेत. या उपक्रमामुळे दक्षिण सोलापूरचा शिष्यवृत्तीचा निकाल यंदा नक्कीच उंचावणार, असा विश्वास व्यक्त होत आहे.
________________
*बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा -*
*संपादक :- अमोगसिद्ध मुंजे*
*मो. 9423535294*












