Tuesday, October 27, 2026
Navprabhatnews
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य
No Result
View All Result
Navprabhatnews
No Result
View All Result

मंद्रूप पोलिसांचा सीना नदीत मध्यरात्री धाडसी कारवाई,

वाळू माफियांना बेड्या, २२ लाखांचा मुद्देमाल जप्त!

संपादक-अमोगसिध्द मुंजे by संपादक-अमोगसिध्द मुंजे
October 7, 2026
in सोलापूर
0
मंद्रूप पोलिसांचा सीना नदीत मध्यरात्री धाडसी कारवाई,
0
SHARES
371
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

तीन दिवस सापळा रचून राजूरमध्ये धाडसी कारवाई;

१० जणांवर गुन्हा, रस्ता नसतानाही पोलिसांनी गाठलं ठिकाण!

दक्षिण सोलापूर – सीना नदीत बिनधास्त वाळू उपसा करणाऱ्या वाळू माफियांवर मंद्रूप पोलिसांनी मोठा हातोडा मारला आहे. परिविक्षाधीन पोलीस उपविभागीय अधिकारी गणेश शिंदे यांच्या पथकाने मंगळवारी रात्री ११.३० वाजता राजूर-सिंदखेड दरम्यान सीना नदी पात्रात धाड टाकली. इरप्पा रणखांबे यांच्या शेताजवळ सुरू असलेल्या अवैध वाळू उपशावर ही कारवाई करण्यात आली.
या कारवाईत पोलिसांनी तब्बल २२ लाख ५५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
१५ लाखांचे ३ टेम्पो, ४ लाखांची स्विफ्ट डिझायर कार , १ लाख ७० हजारांच्या दुचाकी व २ लाखांचे मोबाईल असे एकूण २२ लाख ५५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
यामध्ये १० आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आले असून ७ आरोपी अटकेत आहेत. तर ३ आरोपी फरार आहेत.
अर्जुन नाईकवाडी, रोहित पवार, सागर पवार, हणमंतु कुंभार, शिवानंद व्हनमाने, गणेश पाटील, विजय रणखांबे यांच्यासह १० जणांवर गुन्हा दाखल झाला असून ७ जणांना अटक केली आहे. सोमा गायकवाड, मनोज कनपुवडीयार, सोमा शिवगुंडे हे तिघे फरार आहेत.
रस्ता नसतानाही ३ दिवस सापळा रचून केलेल्या या धाडसी कारवाईमुळे अवैध वाळू उपसा करणाऱ्यांमध्ये चांगलीच धडकी भरली आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर अधीक्षक विजय कबाडे, उपविभागीय अधिकारी सुरज जगताप यांच्या मार्गदर्शना खाली गणेश शिंदे, रविंद्र चव्हाण, अशपाक मियाँवाले, बिराण्णा वाघमोडे, चेतन गवंडी, गणेश पाटील यांनी केली.

________________
*बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा -*
*संपादक :- अमोगसिद्ध मुंजे*
*मो. 9423535294*

Previous Post

शिष्यवृत्ती परीक्षा गाजवण्यासाठी दक्षिणच्या पोरांची विशेष तयारी

Next Post

RTO कडून ६५ वाहनांना चलन २५ लाख दंड 

संपादक-अमोगसिध्द मुंजे

संपादक-अमोगसिध्द मुंजे

Next Post
RTO कडून ६५ वाहनांना चलन २५ लाख दंड 

RTO कडून ६५ वाहनांना चलन २५ लाख दंड 

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सोलापुरात निघाली “बांगडी”  म्हशीची अंत्ययात्रा

जाणून घ्या, पदवीधर आणि शिक्षक आमदार मतमोजणी पद्धत

October 26, 2026
महर्षी वाल्मिकी जयंती सोलापुरात उत्साहात

महर्षी वाल्मिकी जयंती सोलापुरात उत्साहात

October 26, 2026
तुळजापूरला पायी जाणाऱ्या भाविकांसाठी श्री सोमेश्वर पतसंस्थेचा महाप्रसाद

तुळजापूरला पायी जाणाऱ्या भाविकांसाठी श्री सोमेश्वर पतसंस्थेचा महाप्रसाद

October 23, 2026
कंदलगाव येथे २८ लाखांचा गुटखा जप्त

कंदलगाव येथे २८ लाखांचा गुटखा जप्त

October 22, 2026
सोलापुरात निघाली “बांगडी”  म्हशीची अंत्ययात्रा

सोलापुरात निघाली “बांगडी” म्हशीची अंत्ययात्रा

October 22, 2026
खत खरेदी-विक्रीसाठी QR कोड बंधनकारक

खत खरेदी-विक्रीसाठी QR कोड बंधनकारक

October 21, 2026
किसान सभेचे ठिय्या आंदोलन

किसान सभेचे ठिय्या आंदोलन

October 20, 2026
जिल्हाधिकारी यांच्या नावाने “फेक” अकाउंट

जप्ती केल्यास कठोर कारवाई ! जिल्हाधिकारी यांचा मायक्रो फायनान्स कंपन्यांना दम

October 19, 2026

राजकारण

No Content Available
Load More

वेबसाईट दर्शक

153313

वृत्त संग्रह

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • About Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य

© Website Design by Digital Buffalo - 9028927697