Tuesday, October 27, 2026
Navprabhatnews
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य
No Result
View All Result
Navprabhatnews
No Result
View All Result

RTO कडून ६५ वाहनांना चलन २५ लाख दंड 

संपादक-अमोगसिध्द मुंजे by संपादक-अमोगसिध्द मुंजे
October 12, 2026
in सोलापूर
0
RTO कडून ६५ वाहनांना चलन २५ लाख दंड 
0
SHARES
76
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध प्रादेशिक परिवहन कार्यालयाची कारवाई

सोलापूर : रस्ते सुरक्षा, वाहतूक नियमांचे पालन आणि मोटार वाहन कायद्यातील तरतुदींची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या उद्देशाने प्रादेशिक परिवहन कार्यालय, सोलापूर यांच्या वतीने विशेष वाहन तपासणी मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेदरम्यान एकूण १९३ वाहनांची तपासणी करण्यात आली असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ६५ वाहनांना चलन बजावण्यात आले.
या कारवाईतून एकूण २४.६० लाख रुपयांचा दंड आकारण्यात आला. तपासणीदरम्यान भंगार रिक्षा, अल्पवयीन चालकांकडून चालविण्यात येणारी वाहने, उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांकपट्टी (एचएसआरपी) नसलेली वाहने, वाहन चालविण्याचा वैध परवाना नसलेले चालक, वैध योग्यता प्रमाणपत्र (फिटनेस) नसलेल्या रिक्षा, विमा नसलेली वाहने तसेच इतर वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांविरुद्ध मोटार वाहन कायद्यातील तरतुदींनुसार दंडात्मक कारवाई करण्यात आली.
ही मोहीम प्रादेशिक परिवहन अधिकारी गजानन नेरपगार यांच्या निर्देशानुसार, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी स्वप्निल गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आली. मोटार वाहन निरीक्षक संतोष झगडे, दिनेश ढोकणे, गणेश तपकिरे, प्रणव चव्हाण, श्रेयस सरागे आणि धनंजय थोरे यांनी आपल्या पथकातील सहायक मोटार वाहन निरीक्षकांसह या मोहिमेत सहभाग घेतला.
वाहनधारकांनी आपल्या वाहनांची आवश्यक कागदपत्रे वैध व अद्ययावत ठेवावीत. वाहनासंबंधी लागू असलेल्या सर्व कायदेशीर तरतुदींचे पालन करावे, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी, विजय पाटील यांनी केला आहे.

________________
*बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा -*
*संपादक :- अमोगसिद्ध मुंजे*
*मो. 9423535294*

Previous Post

मंद्रूप पोलिसांचा सीना नदीत मध्यरात्री धाडसी कारवाई,

Next Post

शहराच्या विकासात पत्रकारांची भूमिका मोलाची : महापौर

संपादक-अमोगसिध्द मुंजे

संपादक-अमोगसिध्द मुंजे

Next Post
शहराच्या विकासात पत्रकारांची भूमिका मोलाची : महापौर

शहराच्या विकासात पत्रकारांची भूमिका मोलाची : महापौर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सोलापुरात निघाली “बांगडी”  म्हशीची अंत्ययात्रा

जाणून घ्या, पदवीधर आणि शिक्षक आमदार मतमोजणी पद्धत

October 26, 2026
महर्षी वाल्मिकी जयंती सोलापुरात उत्साहात

महर्षी वाल्मिकी जयंती सोलापुरात उत्साहात

October 26, 2026
तुळजापूरला पायी जाणाऱ्या भाविकांसाठी श्री सोमेश्वर पतसंस्थेचा महाप्रसाद

तुळजापूरला पायी जाणाऱ्या भाविकांसाठी श्री सोमेश्वर पतसंस्थेचा महाप्रसाद

October 23, 2026
कंदलगाव येथे २८ लाखांचा गुटखा जप्त

कंदलगाव येथे २८ लाखांचा गुटखा जप्त

October 22, 2026
सोलापुरात निघाली “बांगडी”  म्हशीची अंत्ययात्रा

सोलापुरात निघाली “बांगडी” म्हशीची अंत्ययात्रा

October 22, 2026
खत खरेदी-विक्रीसाठी QR कोड बंधनकारक

खत खरेदी-विक्रीसाठी QR कोड बंधनकारक

October 21, 2026
किसान सभेचे ठिय्या आंदोलन

किसान सभेचे ठिय्या आंदोलन

October 20, 2026
जिल्हाधिकारी यांच्या नावाने “फेक” अकाउंट

जप्ती केल्यास कठोर कारवाई ! जिल्हाधिकारी यांचा मायक्रो फायनान्स कंपन्यांना दम

October 19, 2026

राजकारण

No Content Available
Load More

वेबसाईट दर्शक

153313

वृत्त संग्रह

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • About Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य

© Website Design by Digital Buffalo - 9028927697