Tuesday, October 27, 2026
Navprabhatnews
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य
No Result
View All Result
Navprabhatnews
No Result
View All Result

शहराच्या विकासात पत्रकारांची भूमिका मोलाची : महापौर

संपादक-अमोगसिध्द मुंजे by संपादक-अमोगसिध्द मुंजे
October 12, 2026
in सोलापूर
0
शहराच्या विकासात पत्रकारांची भूमिका मोलाची : महापौर
0
SHARES
46
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

श्रमिक पत्रकार संघाच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा महापालिकेत सत्कार

सोलापूर : लोकशाहीमध्ये पत्रकारितेचे स्थान महत्त्वाचे असून पत्रकार समाजातील विविध प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविण्याचे काम करतात. शहराच्या विकासातही पत्रकारांची भूमिका मोलाची आहे. त्यामुळे पत्रकारांच्या समस्या समजून घेऊन त्या सोडविण्यासाठी महापालिका सकारात्मक दृष्टिकोन ठेवेल. पत्रकारांच्या गृह प्रकल्पासाठी सर्वतोपरी सहकार्य राहील, अशी ग्वाही महापौर विनायक कोंड्याल यांनी दिली.
सोलापूर श्रमिक पत्रकार संघाच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार महापौर विनायक कोंड्याल यांच्या हस्ते सोमवारी महापौर कार्यालयात करण्यात आला.
यावेळी उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, सभागृह नेते नरेंद्र काळे, स्थायी समिती सभापती रंजिता चाकोते, भाजप शहराध्यक्ष तथा नगरसेविका रोहिणी तडवळकर आणि नगरसेवक मनीष केत आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी सोलापूर श्रमिक पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी चौदाव्यांदा निवड झाल्याबद्दल विक्रम खेलबुडे , सरचिटणीस आफताब शेख , खजिनदार विजय गायकवाड, उपाध्यक्ष अविनाश गायकवाड, नितीन पात्रे,
चिटणीस रतन (आप्पा) बनसोडे, प्रीतम पंडित,
सहचिटणीस रोहित थळवे, कार्यकारिणी सदस्य रवी ढोबळे, श्रीनिवास मावनूर, गौतम गायकवाड, विक्रांत कालेकर, सचिन जाधव, यशवंत गुरव, नितीन कटके, मुजम्मील शाहनूरकर, सागर इप्पलपल्ली, महेश कुलकर्णी. सल्लागार प्रशांत जोशी आदींसह पदाधिकारी व कार्यकारणी सदस्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी पत्रकारांनी सोलापूर शहर विकासासाठी सकारात्मक भूमिका घेतली पाहिजे.
पत्रकारांच्या गृहप्रकल्प सोयी सुविधायुक्त व्हावा यासाठी नेहमी सहकार्याची भूमिका राहील, असे आश्वासन देत नूतन पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. प्रास्ताविक व सूत्रसंचालन पत्रकार किरण बनसोडे यांनी केले. जनसंपर्क अधिकारी गणेश बिराजदार यांनी आभार मानले.

________________
*बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा -*
*संपादक :- अमोगसिद्ध मुंजे*
*मो. 9423535294*

Previous Post

RTO कडून ६५ वाहनांना चलन २५ लाख दंड 

Next Post

१६ ऑक्टोबरपासून जिल्ह्यात १० टक्के पाणीकपात

संपादक-अमोगसिध्द मुंजे

संपादक-अमोगसिध्द मुंजे

Next Post
जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची नागपूरला बदली

१६ ऑक्टोबरपासून जिल्ह्यात १० टक्के पाणीकपात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सोलापुरात निघाली “बांगडी”  म्हशीची अंत्ययात्रा

जाणून घ्या, पदवीधर आणि शिक्षक आमदार मतमोजणी पद्धत

October 26, 2026
महर्षी वाल्मिकी जयंती सोलापुरात उत्साहात

महर्षी वाल्मिकी जयंती सोलापुरात उत्साहात

October 26, 2026
तुळजापूरला पायी जाणाऱ्या भाविकांसाठी श्री सोमेश्वर पतसंस्थेचा महाप्रसाद

तुळजापूरला पायी जाणाऱ्या भाविकांसाठी श्री सोमेश्वर पतसंस्थेचा महाप्रसाद

October 23, 2026
कंदलगाव येथे २८ लाखांचा गुटखा जप्त

कंदलगाव येथे २८ लाखांचा गुटखा जप्त

October 22, 2026
सोलापुरात निघाली “बांगडी”  म्हशीची अंत्ययात्रा

सोलापुरात निघाली “बांगडी” म्हशीची अंत्ययात्रा

October 22, 2026
खत खरेदी-विक्रीसाठी QR कोड बंधनकारक

खत खरेदी-विक्रीसाठी QR कोड बंधनकारक

October 21, 2026
किसान सभेचे ठिय्या आंदोलन

किसान सभेचे ठिय्या आंदोलन

October 20, 2026
जिल्हाधिकारी यांच्या नावाने “फेक” अकाउंट

जप्ती केल्यास कठोर कारवाई ! जिल्हाधिकारी यांचा मायक्रो फायनान्स कंपन्यांना दम

October 19, 2026

राजकारण

No Content Available
Load More

वेबसाईट दर्शक

153313

वृत्त संग्रह

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • About Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य

© Website Design by Digital Buffalo - 9028927697