बंकलगी येथे गॅस स्फोटात घर जळून खाक
दक्षिण सोलापूर – बंकलगी येथे गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन घर जळून खाक झाल्याने कोळी कुटुंबावर मोठे संकट ओढवले आहे. या घटनेची माहिती मिळताच एम. के. फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तथा सागर सिमेंटचे महाराष्ट्र हेड महादेव कोगनुरे यांनी तात्काळ धाव घेत जळीतग्रस्त कुटुंबाचे सांत्वन केले आणि मदतीचा हात पुढे केला.
बंकलगी येथील बसवराज गोविंद (ढोणज) कोळी यांच्या घरात गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन भीषण आग लागली. या आगीत घरातील संसारो पयोगी साहित्यासह संपूर्ण घर जळून खाक झाले. या घटनेची माहिती बंकलगी येथील
एम. के. फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी दूरध्वनीद्वारे महादेव कोगनुरे यांना दिली. सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून त्यांनी तात्काळ बंकलगी गाठून कोळी कुटुंबाची भेट घेतली.
“अचानक आलेल्या संकटात कुटुंबाचे मोठे नुकसान झाले आहे. अशा कठीण प्रसंगी माणुसकीच्या नात्याने पाठीशी उभे राहणे हे आपले कर्तव्य आहे,” असे सांगत कोगनुरे यांनी कुटुंबाला धीर देत मदतीचा खारीचा वाटा उचलला. कोगनुरे यांच्या या तत्पर मदतीबद्दल ग्रामस्थांमधून कौतुक होत आहे.
यावेळी रेवणसिद्ध कोणदे, राजशेखर सगरे, काशपा गुरुजी, मंत्रीशे गुरुजी, भागण्णा दुषवंत, चंदू कोणदे, नागनाथ कोणदे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
________________
*बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा -*
*संपादक :- अमोगसिद्ध मुंजे*
*मो. 9423535294*














