Tuesday, October 27, 2026
Navprabhatnews
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य
No Result
View All Result
Navprabhatnews
No Result
View All Result

निंबर्गी येथे शासनाचे सर्व दाखले एकाच छताखाली

संपादक-अमोगसिध्द मुंजे by संपादक-अमोगसिध्द मुंजे
October 15, 2026
in सोलापूर
0
निंबर्गी येथे शासनाचे सर्व दाखले एकाच छताखाली
0
SHARES
207
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

श्री छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर संपन्न;

दक्षिण सोलापूर ..
पूर्वी एका दाखल्यासाठी शेतकऱ्याला व लाभार्थ्याला तहसीलसह विविध विभागाचे उंबरठे झिजवावे लागत होते. आता राज्य सरकारने ‘सर्व दाखले एकाच छताखाली’ ही संकल्पना आणून खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे. म्हणून या शिबिराचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा. शासन तुमच्या दारात आले आहे, त्याचा फायदा घ्या. निंबर्गीचे . मंडळ अधिकारी राणा वाघमारे यांनी सर्व विभागांना एकाच छताखाली आणून लाभार्थ्यांची सोय केली आहे .” असे गौरव उद्गार राज्य शासन वसंतराव नाईक पुरस्कार प्राप्त शेतीनिष्ठ पुरस्कार प्राप्त व निम्बर्गीचे प्रगतशील शेतकरी गंगाधर बिराजदार यांनी केले.
महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागामार्फत व मंद्रूप अप्पर तहसील अंतर्गत आयोजित श्री छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर निंबर्गी येथे पार पडले. या शिबिरात शेतकऱ्यांना व नागरिकांना शासनाचे सर्व दाखले एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन गंगाधर बिराजदार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पोलीस पाटील राजकुमार बिराजदार व मंडल अधिकारी राणा वाघमारे उपस्थित होते.
यावेळी निम्बर्गीचे मंडळ अधिकारी राणा वाघमारे म्हणाले की “राज्य शासनाच्या निर्देशानुसार दक्षिण सोलापूर तालुक्यातील प्रत्येक मंडलात हे महाराजस्व समाधान शिबीर राबवले जात आहे. या शिबिराचा मुख्य उद्देश नागरिकांना जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, रहिवासी दाखला, ७/१२, ८-अ, फेरफार, ई-केवायसी यासारखे सर्व दाखले तात्काळ मिळावेत हा आहे. वरिष्ठ अधिकारी व सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी सहकार्य केल्यामुळे समाधान शिबीर यशस्वी झाले. यावेळी शेकडो लाभार्थ्यांना विविध दाखल्यांचे वाटप करण्यात आल्याचे मंडळ अधिकारी वाघमारे यांनी सांगितले.
निंबर्गी येथील  शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिरात शेकडो नागरिकांनी विविध दाखल्यांसाठी अर्ज केले व अनेकांना जागेवरच दाखले वाटप करण्यात आले. यावेळी सहाय्यक कृषी अधिकारी अशोक राठोड, तलाठी राजेश विटेकर , गणेश भुजबळ, निंगु कोळी, भारत फरताडे, अनिल उमदी, किरण कौटुळे, धनराज साळवे, नेहा पवार, युसुफ शेख, किरण काटे, हर्षल पाटील, रवी कोळी, डॉ. दिपाली कोरे, वाहतूक नियंत्रक अमर यादव , जयश्री दरेकर यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
दक्षिण सह सर्वत्र दुष्काळ असल्यामुळे कार्यक्रमात प्रमुख पाहुण्यांचे सत्कार करण्यात आले नाही .

________________
*बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा -*
*संपादक :- अमोगसिद्ध मुंजे*
*मो. 9423535294*

Previous Post

जळीतग्रस्त कोळी कुटुंबाला एमके. यांचा मदतीचा हात

Next Post

महसूल सहाय्यकांना “नायब तहसीलदार” पदाची संधी द्या

संपादक-अमोगसिध्द मुंजे

संपादक-अमोगसिध्द मुंजे

Next Post
महसूल सहाय्यकांना “नायब तहसीलदार” पदाची संधी द्या

महसूल सहाय्यकांना "नायब तहसीलदार" पदाची संधी द्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सोलापुरात निघाली “बांगडी”  म्हशीची अंत्ययात्रा

जाणून घ्या, पदवीधर आणि शिक्षक आमदार मतमोजणी पद्धत

October 26, 2026
महर्षी वाल्मिकी जयंती सोलापुरात उत्साहात

महर्षी वाल्मिकी जयंती सोलापुरात उत्साहात

October 26, 2026
तुळजापूरला पायी जाणाऱ्या भाविकांसाठी श्री सोमेश्वर पतसंस्थेचा महाप्रसाद

तुळजापूरला पायी जाणाऱ्या भाविकांसाठी श्री सोमेश्वर पतसंस्थेचा महाप्रसाद

October 23, 2026
कंदलगाव येथे २८ लाखांचा गुटखा जप्त

कंदलगाव येथे २८ लाखांचा गुटखा जप्त

October 22, 2026
सोलापुरात निघाली “बांगडी”  म्हशीची अंत्ययात्रा

सोलापुरात निघाली “बांगडी” म्हशीची अंत्ययात्रा

October 22, 2026
खत खरेदी-विक्रीसाठी QR कोड बंधनकारक

खत खरेदी-विक्रीसाठी QR कोड बंधनकारक

October 21, 2026
किसान सभेचे ठिय्या आंदोलन

किसान सभेचे ठिय्या आंदोलन

October 20, 2026
जिल्हाधिकारी यांच्या नावाने “फेक” अकाउंट

जप्ती केल्यास कठोर कारवाई ! जिल्हाधिकारी यांचा मायक्रो फायनान्स कंपन्यांना दम

October 19, 2026

राजकारण

No Content Available
Load More

वेबसाईट दर्शक

153308

वृत्त संग्रह

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • About Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य

© Website Design by Digital Buffalo - 9028927697